नागपुर एका पोलीसाला बंदुक दुरस्त करणं पडलं महागात, पोलिस कर्मचाऱ्याच्या मांडीला लागली गोळी.

✒युवराज मेश्राम✒
नागपूर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.17 जुलै:- नागपुर जिल्हातील बेलतरोडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेलतरोडी पोलिस स्टेशन मध्ये बीट मार्शल पदावर कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने लॉक झालेली पिस्टल दुरुस्त करताना अचानक गोळी चालली. ती गोळी थेट कर्मचाऱ्याच्या मांडीतून आरपार झाली. गंभीर जखमी अवस्थेत पोलिस कर्मचाऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेषकुमार इंगळे वय 35 वर्ष असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. या घटने मुळे सर्वीकडे एकच खळबळ उडाली आहे.