शिक्षाबंदी कै. शरद इंदल परदेशी यांच्या मृत्यूबद्दल आक्षेप नोंदविण्याचे आवाहन -उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा
शिक्षाबंदी कै. शरद इंदल परदेशी यांच्या मृत्यूबद्दल आक्षेप नोंदविण्याचे आवाहन -उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा

शिक्षाबंदी कै. शरद इंदल परदेशी यांच्या
मृत्यूबद्दल आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
-उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा

शिक्षाबंदी कै. शरद इंदल परदेशी यांच्या मृत्यूबद्दल आक्षेप नोंदविण्याचे आवाहन -उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा
शिक्षाबंदी कै. शरद इंदल परदेशी यांच्या
मृत्यूबद्दल आक्षेप नोंदविण्याचे आवाहन
-उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा

*मिडिया वार्ता न्यूज*
   *जळगाव जिल्हा प्रतिनिधी*
    ✒ *विशाल सुरवाडे* ✒

जळगाव- दि. 17- नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षाबंदी असलेले कै. शरद इंदल परदेशी यांचे मयताबाबत आक्षेप असल्यास 20 जुलै, 2021 पावेतो उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय कार्यालय, एकात्मता चौक, कॉलेज रोड, नवीन तहसिल कार्यालय, मालेगांव, जि. नाशिक यांना लेखी स्वरुपात खुलासा कळविण्यात यावा. सदर तारखेपर्यंत खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल. असे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाबंदी क्रं.सी. 11165 कै. शरद इंदल परदेशी यांस बाल लैगिंक अत्याचार संरक्षण कायदा, 2012 च्या कलम 5 (1), 06, 42 भादंवि, 1860 कलम 376 (2), प्रमाणे अपराधांसाठी स्पे.के.नं. 50/2013 मध्ये दि. 20 मार्च, 2017 रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश-1 व विशेष न्यायाधीश-1 (पोक्सो) जळगाव, जि. जळगाव यांनी 10 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती. दि. 26 मार्च, 2017 पासुन सदर बंदी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल झाला होता.
सदर बंदी करागृहातील स्वयंपाकगृह विभागात हाड्यांचे (डाळ बनविण्याचे) काम करीत असतांना दि. 3 जुलै, 2018 रोजी हंडा उचलण्याचे क्रेनमध्ये अचानक विद्युतप्रवाह झाल्याने बंद्यास शॉक लागल्याने स्वयंपाकगृह विभागातील कर्मचारी यांनी बंद्यास इतर बंद्यांच्या सहाय्याने कारागृह रुग्णालयात नेले असता कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी दि. 3 जुलै, 2018 रोजी दुपारी 14.25 वाजता मयत घोषित केले. फौजदारी प्रकिया संहिता, 1973 मधील कलम 176 (1) (2) (3) (4) अन्वये कै. शरद इंदल परदेशी यांचे मृत्युबाबतची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांनी उपविभागीय दंडाधिकारी, मालेगांव यांना दिले आहेत.
तरी कै. शरद इंदल परेदशी यांच्या मयताबाबत आक्षेप असल्यास 20 जुलै, 2021 पर्यंत लेखी स्वरुपात कळविण्यात यावा. असे उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here