मुंबईत चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, 28 वर्षीय आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930
मुंबई,दि.18 जुलै:- मुंबईत एक 4 वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार झाल्याने हादळली आहे. यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. चिमुकलीवर बलात्कार केल्या प्रकरणी 28 वर्षीय नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
मुंबईतील साकीनाका पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणा-या परीसरात एका चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
आपल्या पोटच्या मुलीवर 28 वर्षिय नराधमाने अत्याचार केल्याची माहित पडल्यामुळे पीडितेच्या आईच्या पोलिस स्टेशन मध्ये जाऊन नराधम आरोपिवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 28 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आयपीसी कलम 376 सोबतच पॉक्सो अॅक्ट अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 4 वर्षाच्या मुलीला एकटंच पाहून आरोपीने तिला आईस्क्रिम घेऊन देण्याच्या बहाण्याने बोलावलं. त्यानंतर मुलीला सोबत नेऊन तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी आणि पीडित मुलगी एकाच परिसरात राहत असल्याची माहिती आहे.