*शिर्डी मंदिरात धाडसी दरोडा, देवांच्या मुकूटांसह दागिने लपास*

56

*शिर्डी मंदिरात धाडसी दरोडा, देवांच्या मुकूटांसह दागिने लपास*

शिर्डी:- आज मंदिर सुरक्षित नाही चोरा पासुन, अशीच एक घटना शिर्डी जवळील राहाता शहराचे ग्रामदैवत असलेल्या विरभद्र महाराज मंदिरात धाडसी दरोड्याची घटना घडली आहे.
शिर्डी जवळील राहाता शहराचे ग्रामदैवत असलेल्या विरभद्र महाराज मंदिरात धाडसी दरोड्याची घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास‌ ही चोरी झाली. दोन अज्ञात चोरटे मंदिर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
विरभद्र महाराजांचा चांदीच्या‌ मुकूटासह अनेक आभुषणे असा सुमारे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. त्यात विरभद्र महाराजांचा चांदीचा‌ मुकूट तसेच शंकर, पार्वतीच्या डोक्यावरील मुकूट तसेच इतर दागिन्यांचा समावेश आहे. दोन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मिळालेली माहिती अशी की, कोरोनाच्या‌ पार्श्वभूमीवर राहाता येथील विरभद्र महाराज मंदिर बंद आहे. मंदिरातील पुजारी केवळ दैनदिन पूजा करतात. मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या‌ सुमारास दोन चोरट्यांनी भिंतीवरून उडी मारून प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. विरभद्र मंदिराच्या‌ गाभाऱ्यात घूसून चोरट्यांनी चांदीचा‌ मुकूट‌ चोरला तर मंदिराच्या आतील शंकर पार्वतीच्या मूर्तीवरील मूकूटही चोरट्यांनी लांबवला. पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास वॉचमनने बघितले असता कुलूप तोडल्याचे त्याच्या‌‌ लक्षात आले. त्यानं तातडीने सदर माहिती मंदिराचे विश्वस्त, अध्यक्ष तसेच पोलिसांना दिली. अतिरिक्त पोलिस अधिक्षक दिपाली काळे, शिर्डीचे विभागीय‌ पोलिस‌ अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. श्वानपथकाने मंदिरापासून मागच्या बाजूने 2 किलोमीटरपर्यत चोरट्यांचा माग काढला. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये‌ चोरटे कैद झाले आहेत. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिस‌ांचे प्रयत्न सुरू आहेत.
विरभद्र महाराज हे गावचे ग्रामदैवत असल्याने मंदिराजवळ ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या चोरीमुळे गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चोरट्यांनी लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी विरभद्र देवस्थानचे अध्यक्ष तसेच गावकऱ्यांनी केली