*कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने खाजगी
रुग्णालयांनी ऑक्सिजन साठवण क्षमता वाढवावी*
*जिल्हाधिकारी पृथ्वीराज पी.बी.*
*प्रत्येक तालुक्यात रेफर रुग्णांसाठी सर्व आरोग्य सुविधायुक्त रुग्णवाहिका तयार ठेवावी*
*कोविडच्या चाचण्या कमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी*

रुग्णालयांनी ऑक्सिजन साठवण क्षमता वाढवावी*
*जिल्हाधिकारी पृथ्वीराज पी.बी.*
*प्रत्येक तालुक्यात रेफर रुग्णांसाठी सर्व आरोग्य सुविधायुक्त रुग्णवाहिका तयार ठेवावी*
*कोविडच्या चाचण्या कमी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी*
✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यू-8208166961
लातूर,(जिमाका):-कोविड च्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना ऑक्सीजन पुरवठ्याबाबत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकली असती; पण वेळीच नियोजन झाल्याने ती परिस्थिती टळली. त्या अनुषंगाने शासकीय स्तरावर संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन क्षमता वाढवण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व खाजगी रुग्णालयांनी ही संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून त्यांच्याकडील ऑक्सीजन साठवण क्षमतेत वाढ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविडच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्स च्या बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राहुल वाघमारे, बाल रोग तज्ञ शिवप्रसाद मुंदडा, डॉ. संदिपान साबदे, डॉक्टर महिंद्रकर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेखा काळे यांच्यासह जिल्हास्तरीय टास्क फोर्स चे सर्व सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज पुढे म्हणाले, कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासकीय स्तरावर ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ करण्यात आलेली आहे. तरी खाजगी रुग्णालयांनी हे त्यांच्याकडील ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे. त्यांनी जंबो व डुरो सिलेंडर ची संख्या वाढवावी. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा कार्यालयानेही यामध्ये लक्ष घालून खाजगी रुग्णालयांना ऑक्सिजन साठवण क्षमता वाढविणे बाबत मार्गदर्शन करावे. जेणेकरून संभाव्य तिसर्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यास व ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर झाल्यास ही ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील, असेही त्यांनी सूचित केले.
आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रेफरल रुग्णांसाठी एक सर्व आरोग्य सोयींनी युक्त अशी रुग्णवाहिका तयार करून ठेवावी. याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी ही रुग्णवाहिका जुलै 2021 अखेर पर्यंत कार्यान्वित होईल याबाबत दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी निर्देशित केले. त्याप्रमाणेच वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कोवीडच्या चाचण्या कमी होणार नाहीत; यासाठी दैनंदिन चाचण्या घेण्याचे वेळापत्रक तयार करून त्या पद्धतीने त्या त्या गटातील चाचण्या घ्याव्यात असेही त्यांनी निर्देशित केले.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर्स, नर्स व इतर स्टाफ साठी आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण विहित वेळेत पूर्ण करावेत. हॅन्डस ऑन ट्रेनिंग जुलै 2021 अखेर पूर्ण झाले पाहिजेत याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासकीय व खाजगी स्तरावर तयार करण्यात येत असलेल्या सुविधा बाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करून घ्यावी. तसेच आणखी काही आरोग्यसविधा वाढवण्याची गरज असेल तर त्याबाबत
कळवावे असेही त्यांनी सूचित केले.
प्रारंभी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हरिदास यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेच्या तयारीबाबत ची माहिती बैठकीत सादर केली. शासकीय व खाजगी स्तरावर एकूण 10 हजार बेडची उपलब्धता ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यासंबंधी तिसऱ्या लाटेच्या अनुशंगाने बालकांना व इतर रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधी पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात बालकांसाठी किमान 200 ऑक्सिजन बेडचे उपलब्ध त्याचा ठेवण्याचे उद्दिष्ट दिलेले असून आरोग्य विभागाने शासकीय व खाजगी एकूण 540 ऑक्सिजन बेड निर्माण करण्याचे नियोजन ठेवलेले आहे. यामध्ये प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात दहा याप्रमाणे एकूण 100, उपजिल्हा रुग्णालय 15, स्त्री रुग्णालय 20, सामान्य रुग्णालय उदगीर 25, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 50, एम आय टी लातूर 80, खाजगी बाल रुग्णालय एकूण 250 या पद्धतीने नियोजन आहे . तर जिल्ह्यात एकूण 105 आयसीयू बेड्स उपलब्ध करण्यात आल्याची माहिती डॉ. हरिदास यांनी दिली.