सांगली जिल्हात लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे फळाबागायत शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान.

संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
9890093862
सांगली :- महाराष्ट्र कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे सतत लॉकडाऊन आणि नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यातील फळाबागायत शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथील शेतकऱ्यांने तब्बल 10 एकर पेरूच्या बागेवर कुऱ्हाडीचा घाव घातले आहे. महेंद्रसिंह बाळासाहेब शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. एकाचवेळी आसमानी आणि सुलतानी संकटांनी घेरल्यानं हा शेतकरी कर्जबाजारी झाला. हाताशी मुबलक शेती असतानाही निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोनामुळे लागू असलेले निर्बंध या परिस्थिती शेती अडकली. यातूनच लावलेल्या बागेतून उत्पन्न कमी आणि कर्जच वाढत असल्यानं त्यांनी अखेर बाग तोडण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे.

सततच्या लॉकडाऊनमुळे शेतक-यांनी आपला शेतीमाल बाजारात नेला नाही. आणि दुसरीकडे फळ व्यापाऱ्यांनी शेतातील पेरू विकतच घेतले नाही. त्यामुळे पेरू झाडावरच सडले. यावर्षी तर बागेचा खर्च तरी निघेल असं वाटत होतं. पण अवकाळी आणि वादळी पावसाने आलेली फळे गळून गेली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मग शेतकरी चिल्लावत असताना शासनाने पंचनामे करण्याचा निर्णय घेतला, पण अजुन पर्यंत कुठलिही मदत शेतक-यांना दिली नाही, अशी तक्रार या शेतकऱ्याने केलीय. मदत न मिळाल्यानं अखेर सतत होणारं नुकसान टाळण्यासाठी संतप्त झालेल्या बागायतदार महेंद्रसिंह शिंदे यांनी 10 एकर बागेवर कुऱ्हाडीचा घाव घातला.