रिक्षा चालवणा-याच्या पोरीने घेतले, 100 पैकी 100 टक्के मार्क, इंजिनिअर बनण्याचे आहे सप्न.

✒संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
पुणे :- नामांकित महाविद्यालयातून इंजिनिअरचे शिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी जेईईमध्ये चांगला स्कोअर करायची इच्छा आहे. आई-बाबांचे स्वप्नं साकार करण्यासाठी खूप शिकायचे आहे. त्यांनी आजपर्यंत केलेली मेहनत वाया जाऊ देणार नाही, असा आत्मविश्वास दहावीच्या परीक्षेत तब्बल १०० टक्के गुण मिळविणाऱ्या वैष्णवी पांडुळे हिने व्यक्त केला.
खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयातील वैष्णवी ही शिक्षण घेते. तिचे वडील बबन पांडुळे हे गेल्या बारा वर्षांपासून पुण्यातील येथील खराडी परिसरात रिक्षा चालवत आहेत. बिकट परिस्थितीमुळे आपल्याला उच्च शिक्षण घेता न आल्याची खंत त्यांना आहे. मात्र, आपल्या पोरांनी चांगले शिक्षण घ्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. वैष्णवीने दहावीत मिळविलेल्या यशाबद्दल पांडुळे भरभरून बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘एका रिक्षावाले काकाच्या मुलीने १०० टक्के गुण मिळविल्याचा अभिमान आहे. मला दोन मुली, एक मुलगा आहे. मोठी मुलगी कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. दुसरी मुलगी म्हणजे वैष्णवी आणि लहान मुलगा नववीत आहे. परंतु मी माझ्या सगळ्या मुलांना खूप शिकवणार आहे. वैष्णवीने आमच्या घराचे नाव मोठे केले.