राजे फाऊंडेशन तर्फे अहेरी शहरातील १०१ लाभार्थ्यांना “आयुष्यमान भारत” योजनेअंतर्गत आरोग्य गोल्डन कार्डचे राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या हस्ते वितरण*

राजे फाऊंडेशन तर्फे अहेरी शहरातील १०१ लाभार्थ्यांना “आयुष्यमान भारत” योजनेअंतर्गत आरोग्य गोल्डन कार्डचे राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या हस्ते वितरण*

राजे फाऊंडेशन तर्फे अहेरी शहरातील १०१ लाभार्थ्यांना "आयुष्यमान भारत" योजनेअंतर्गत आरोग्य गोल्डन कार्डचे राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या हस्ते वितरण*
राजे फाऊंडेशन तर्फे अहेरी शहरातील १०१ लाभार्थ्यांना “आयुष्यमान भारत” योजनेअंतर्गत आरोग्य गोल्डन कार्डचे राजे अम्ब्रीशराव महाराजांच्या हस्ते वितरण*

मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्ह्या प्रतिनिधी
(ग्रामीण)मो.नं ९४०५७२०५९३

अहेरी इस्टेटचे दिवंगत कै.राजे सत्यवानराव महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य..! !*

अहेरी इस्टेटचे दिवंगत राजे तथा कट्टर विदर्भवादी नेते कै.राजे सत्यवानराव महाराज यांच्या १० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राजे फाऊंडेशन अहेरी तर्फे केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना *प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्यमान भारत)* अंतर्गत अहेरी शहरातील १०१ लाभार्थ्यांना आरोग्य गोल्डन कार्डचे वितरण माजी पालकमंत्री मा. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते रुक्मिणी महालात काल करण्यात आले, ह्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५ लाखापर्यंत वैद्यकीय उपचाराचा खर्च केंद्र सरकार तर्फे करण्याची तरतूद असल्याने गरिबांसाठी “जीवदान” अशी ही योजना आहे..
अहेरी शहरामध्ये ह्या योजनेचे लाभार्थी अतिशय कमी असल्याची माहिती मिळाल्यावर मा. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी गेले ८ दिवस मोठी मेहनत घेत, लाभार्थ्यांच्या घरी जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करून हे १०१ आरोग्य गोल्डन कार्ड बनविले होते, आणि समोरही ह्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर राजे फाऊंडेशन, अहेरी तर्फे लाभार्थ्यांना आरोग्य गोल्डन कार्डचे वितरण केले जाणार आहे
ह्या वितरणाच्या वेळी युवा नेते अवधेशराव बाबा, जेष्ठ नेते प्रकाश सावकार गुडेल्लीवार, भाजपा अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुद्री,अमोल गुडेल्लीवार, गिरीष मद्देर्लावार, श्रीनिवास चटारे, विक्की तोडसाम, दिनेश येनगंठीवार, दिलीप पडगेवार, राकेश कोसरे, विनोद जिल्लेला,अक्षय संतोषवार सह अहेरी शहरातील लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती