*रंगभूमीच्या मातृत्व असलेल्या कोकणातील दशावतार कलेला अनुदान द्यावे – राज्यपाल*

प्रतिनिधी – कोकणभूमी मधील दशावतार कलावंतांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व सांस्कृतिक विभागाचे मंत्री अमित देशमुख यांना सदर कलेला अनुदान कसे देता येईल यासंबंधी निर्णय घेऊन कोकणातील खऱ्या अर्थाने कला जोपासणाऱ्या कलावंतांना अनुदान देण्यासाठी सूचना दिल्या यावेळी मालवणी हास्य सम्राट दिगंबर नाईक आणि इतर कलावंत उपस्थित होते.
दशावतार या कला प्रकारचं अनुकरण करून संगीत,रंगभूमीचा उदय झाला आणि आज याच कलेला अनुदान नाही मात्र रंगभूमीच्या प्रत्येक विभागाला शासनाचे अनुदान आहे.परंतु रंगभूमीची ही मातृत्व कला असलेला दशावतार मात्र अजून या अनुदानापासून वंचित आहे.अशी मागणी या कोकणातील दशावतार कलावंतांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. त्यानुसार राज्यपालांनी संबंधित विभागाचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करावी व खऱ्या अर्थाने या कोकण भूमीतील दशावतार कलावंतांना न्याय द्यावा अशी सुचना दिली त्यांनीही लवकरच त्याना न्याय देऊ असे आश्वासन दिले
यावेळी मालवणी हास्य सम्राट दिगंबर नाईक, दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला शिक्षण,प्रशिक्षण,बहुउद्देशीय मंडळ,सिंधुदुर्ग येथील कलावंत सिताराम मयेकर,दत्तप्रसाद शेणई,संतोष रेडकर,आशिष गावडे,रुपेश नेवगी,दशावतार हितवर्धक नाट्य संस्थेचे अध्यक्ष आशिष गावडे,कोषाध्यक्ष रतन परब आदी उपस्थित होती.