ठाण्यात घरांवर डोंगराची दरड कोसळून पाच जणांचा दबून मृत्यू.

ठाण्यात घरांवर डोंगराची दरड कोसळून पाच जणांचा दबून मृत्यू.

ठाण्यात घरांवर डोंगराची दरड कोसळून पाच जणांचा दबून मृत्यू.
ठाण्यात घरांवर डोंगराची दरड कोसळून पाच जणांचा दबून मृत्यू.

नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
9136879930

मुंबई,दि.19 जुलै:- मुंबईच्या उपनगर ठाण्यात दरड कोसळून पाच जणांचा दबून मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. माघील दिन दिवसापासून मुंबईसह उपनगरात पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. सतत धो धो मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान आणि मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी झाली आहे.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व भागातील घोळाई नगर डोंगर परिसरात दरड कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून चार घरांचे नुकसान झाले आहे. शेजाऱ्यांनी तात्काळ घरातील चार नागरिकांना बाहेर काढले, काही नागरिक घरात अडकल्याची शक्यता असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे शोधकार्य सुरू आहे.

मृतांमध्ये 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदतकार्य युद्धापातळीवर सुरू आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. ठाण्याजवळील मासूंदा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे शहराला पुरजन्य परिस्थिती आली आहे. शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.