*तारसा खुर्द येथे प्रभु सदन शेतशीवारात रोवण्याचे चिखल करताना टॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू*

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपीपरी __सवीस्तर वृत असे की तालुक्यातील तारसा खुर्द येथील प्रभु सदन चर्च असलेल्या शेतशिवारात रोवण्याचे काम सुरू आहे त्या कामावर चंदनखेडी येथील प्रमोद गेडाम वय अंदाजे ३६ वर्षिय व्यक्ती आपल्या कुंटुबासह सालगडी राहून काम करत होता
प्रभु सदन तारसा खुर्द येथील काम पहाणाऱ्या फादर च्या देखरेख खाली तो काम करत होता प्रभु सदन च्यास मालकीची असलेल्या टॅक्टर वर तो टॅक्टर चालक म्हणून काम करत होता अशातच अचानक आज दि १९ जूलै रोज सोमवारला शेतशीवारात रोवनीचे काम सुरू असताना शेतात चिखल करताना टॅक्टर बांधीत फसली बल्ली लाउन टॅक्टर बांधीतून काढण्यात आली आणि दुसऱ्या बांधीत टॅक्टर नेत असताना लावलेली बली काढण्याचे विसरून गेल्याने टॅक्टरला लावलेली बली तिथेच अडकुन राहल्याने टॅक्टर पलटला त्यामुळे सदर अपघात घडला या अपघातात चालकाच्या अंगावर टॅक्टर पलटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे त्याच्या पच्छात २ मुली व एक मुलगा असा आप्त परिवार असुन त्याच्या अचानक जाण्याने कुंठूबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे