नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे ट्रकच्या धडकेत मोटरसायकल वरील तरुण-तरुणी जागीच ठार.

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914

नागपूर,दि.19 जुलै:- नागपुर जिल्हातील कामठी येथे एक अपघाताची घटना समोर आली आहे यात एका तरुण आणि तरुणीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वीकडे कडे हयहय व्यक्त करण्यात येत आहे.

कामठी येथिल जयस्तंभ चौकात सोमवारी दुपारी सव्वा वाजताच्या सुमारास एका ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकल वरून जात असलेले तरुण व तरुणी जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

नागपूर येथे राहणारा वैभव शंभरकर हा तरुण मोहिनी नावाच्या मुलीसोबत कामठीमार्गे कन्हानकडे जात असताना जयस्तंभ चौकात मागून येणाऱ्या ट्रकने क्र.एम.एच.40 बी एल 7444 क्रमांकाच्या ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की हे दोघे जागीच मयत झाले.

घटनेची माहिती मिळताच कामठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन दोघांचेही पार्थिव उर्वरीत तपासणीसाठी कामठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून ट्रक ताब्यात घेतला आहे.