नेपियर गवत ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे : जैविक इंधन प्रकल्प विकसित करण्यावर भर

नेपियर गवत ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे : जैविक इंधन प्रकल्प विकसित करण्यावर भर

नेपियर गवत ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे : जैविक इंधन प्रकल्प विकसित करण्यावर भर
नेपियर गवत ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान
एक पाऊल आत्मनिर्भरतेकडे : जैविक इंधन प्रकल्प विकसित करण्यावर भर

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

हिंगणघाट- जैवइंधन व सेंद्रिय खटनिर्मितीची संकल्पना देशाचे माजी राष्ट्रपती व भारताचे महान वैज्ञानिक डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची असून त्यांनी देशाला इंधन क्षेत्रात स्वयंपूर्ण कारण्याचे स्वप्न पाहिले होते.हे स्वन्न आता वास्तवात आणण्यासाठी डॉ.शाम शिवाजी घोलप यांनी मीरा क्लीन फ्युएल (MCL)कंपनीच्या माध्यमातून जैविकइंधन व सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प भारतभर सुरु करण्याचा संकल्प केला आहे.त्याचंतर्गत येणाऱ्या हिंगणघाट तालुका येथे शेकापूर(बाई)येथे ऍग्रो गेन क्रॉप्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्येमानाने शेकापूर(बाई)इथे 1 लक्ष क्षमतेचा दररोज बायो-सिएनजी व सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प तयार होणार आहे.त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत इथे यांचे संकलन केंद्र उभारणार असून त्यापैकी एक येरला ग्रामपंचायत ईथे शिवकृषी संकलन केंद्राची उभारणी प्रकल्प प्रमुख श्री.अभिजित धनराज बेहते व श्री.शिवम विलासराव वानखडे यांच्या निर्धारातून गावातील शेतकरी,महिला,युवावर्ग यांना सुखी,सुमृद्ध व आत्मनिर्भर बनवण्यासाठी संकल्प हाती घेतला असून.त्या साठी कचरा या रुपात हत्ती गवताची लागवड करून त्या गावतापासून जैविकइंधन-सेंद्रिय खत करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.त्यामुळे गावतील सभासद नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एकरी 1 लाख ते 3 लाख उत्पन्न अपेक्षित आहे याला कुठलीही नैसर्गिक आपत्ती व कमी खर्च मध्ये जास्त उत्पन्न होणार आहे व याला 1 हजार प्रतिटन भाव देण्यात आला असून याची खरेदी शिवकृषी संकलन केंद्र वर केली जाईल.व बिगर शेती असणारे महिला यांना व्यवसाय करण्यास मदत करून त्यांना सक्षम करणे हे संकल्प आहे यामुळे गावातील तरुण वर्ग उपलब्ध यांना रोजगार मिळणार असून संपूर्ण गाव समृद्ध होईल.यावेळी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे ठरविले आहे तसेच सरपंच सौ.पंधरे ताई, उपसरपंच श्री झिले साहेब,माजी पंचायत समिती सदस्य येरलेकर साहेब व महिला गट प्रमुख सौ.कविताताई तापरे यांनी हा प्रकल्प गावाच्या हितासाठी असून यांना सहकार्य करण्याचे आश्वसन दिले आहे.

प्रतिक्रिया
@ गावातील शेतकरी,तरुण वर्ग व महिला यांना बनविण्यासोबत त्यांना तांत्रिक बाबीचे ज्ञान देऊन आर्थिक उन्नती कशी साधता येईल याकडे आमचा प्रयत्न आहे व गावातील युवकांना रोजगार व महिला यांना उद्योग साठी प्रेरीत करून त्यांना अर्थसहाय्य कंपणी कडून उपलब्ध करून देऊ अशे आश्वसन देण्यात आले याशिवाय देशात वाढती इंधन दरवाढ व घरघुती गॅस यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून येते काही वर्षात दिलासा मिळणार आहे.
-अभिजित ध.बेहते (कृषी अभियंता)

बियाण्याची मोफत व्यवस्था
शेतकऱ्यांना नेपीयर ग्रासची लागवड करण्याकरिता कंपनीच्या माध्यमातून बियाणेची मोफत व्यवस्था करून तांत्रिक माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे व हे गवत प्रतिटन 1 हजार खरेदी केल्या जाईल यामुळे वार्षिक 1 ते 3 लाख रुपये अपेक्षित आहे.
-शिवम वि वानखडे (Bsc ऍग्री)