मुंबईत कोरोना लसीचा साठा संपला, आज मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.21 जुलै:- महाराष्ट्रात कोरोना वायरसच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात घटला आहे. पण तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वारमवार वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांत कोरोना बदल मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात शासनाकडुन लसीकरणावर जोर दिला जात आहे. परंतु, पुरेशा लसींच्या साठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीमेमध्ये अनेक अडथळे येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल (मंगळवारी) दिनांक 20 जुलै, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील काही लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. तर आज मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद असणार आहे.

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (बुधवार) दिनांक 21 जुलै 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.