माजरी येथे युवा सेनेची बैठक संपन्न, गाव तेथे युवा सेना उपक्रम

माजरी येथे युवा सेनेची बैठक संपन्न, गाव तेथे युवा सेना उपक्रम.

माजरी येथे युवा सेनेची बैठक संपन्न, गाव तेथे युवा सेना उपक्रम.
माजरी येथे युवा सेनेची बैठक संपन्न, गाव तेथे युवा सेना उपक्रम.

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) प्रतिनिधी
 9923497800

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा युवा सेनेच्या शिव संपर्क अभियाना अंतर्गत ‘गाव तेथे युवासेना’ हे ब्रिद लक्षात घेऊन भद्रावती तालुक्यातील माजरी येथे युवा सेनेची बैठक नुकतीच घेण्यात आली.

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, युवासेना कार्यकारणी सदस्य रुपेश दादा कदम व चंद्रपूर जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनानुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीत मान्यवरांनी उपस्थित युवासेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रत्येक गावात युवासेना बळकट करण्याचे आवाहन केले.बैठकीला युवासेना तालुका प्रमुख महेश जीवतोडे, तालुका सरचिटणीस तथा माजरी ग्राम पंचायत सदस्य सरताज सिद्दीकी, शहर युवा सेना प्रमुख तिरुपती, आलेख रट्टे व अनेक युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर बैठक युवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आली.