सांगली जिल्हातील ऑईल व्यवसायीकाची 2 कोरोड रुपयाची फसवणूक.

✒संजय कांबले✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362
सांगली,दि.21 जुलै:- सांगली जिल्हातील तासगांव तालुक्यातील एका ऑईल व्यवसायीका बरोबर 2 करोड रुपयाची फसवणुक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
तासगाव येथील एका व्यवसायीकाला अस बोलण्यात आले की, तुम्ही ऑईल खरेदी करा ते ऑईल आम्ही जास्त दर देवून खरेदी करणार असे सांगून ऑईल व्यवसायीकांची तब्बल 2 करोड रूपयांची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी देण्यात आलेल्या तक्रारी वरून कंपनी व इतर दोघे अशा तिघांच्या विरुध्द तासगांव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुक्यातील ऑईल व्यवसायीक अनिल विश्वासराव पाटील यांनी नेचर फॉर्मा कंपनी लिमिटेड लंडन, व मोनासिंग आनिष्का गुप्ता या तिघा विरुद्ध दोन कोटी रूपयांच्या फसवणुक प्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना 15 जुलै 2020 ते 12 जुलै 2021 या दरम्यान घडली. अनिल पाटील यांचा ऑईल व्यवसाय आहे. त्यांच्याशी नेचर फॉर्मा कंपनीने संपर्क साधला व गारसिनिया कंम्बोजीया कंपनीचे ऑईल अत्यंत चांगले आहे. पण आमची कंपनी असल्याने आम्ही थेट ऑईल घेऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही मोनासिंग व आनिष्का गुप्ता यांच्याकडून ऑईल घ्या, असे सांगून हे घेतलेले ऑईल आम्ही आमच्या कंपनीतर्फे आपल्याकडून जादा दराने खरेदी करतो. असे सांगून पाटील यांचा विश्वास संपादन केला.
त्यानुसार पाटील यांनी मोनासिंग आनिष्का गुप्ता यांच्याकडून ऑईलची खरेदी ही केली हे ऑईल खरेदी करत असताना अनिल पाटील यांनी 1 कोटी 75 लाख रूपये जमा केले तर इतर खर्च 25 लाख रूपये असा एकूण दोन कोटी रूपयांचा खर्च यासाठी झाला. ऑईल खरेदी नंतर फिर्यादी पाटील यांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधून आपण सांगितले प्रमाणे ऑईल खरेदी केले आहे असे सांगितले तसेच ते ऑईल आपण कधी खरेदी करता अशी विचारणा केली. त्यावर कंपनी कडून थोडे थांबा, अडचण आहे अशी वेगवेगळी कारणे सांगितले जात होते नंतर नंतर तर त्यांचे फोन लागणे ही बंद झाले. मात्र सुमारे एक वर्ष झाले तरी कंपनी कडून ऑईल खरेदीसाठी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पाटील यांची आपली सुमारे दोन कोटी रूपयांची फसवणूक झाल्याची खात्री झाली त्यानुसार त्यांनी कंपनीसह तिघा विरूध्द पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रार नोद करुन पोलीस तपास करत आहे.