*महावितरण विभागाची मनमानी! लाडबोरी मधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ठेवले वंचित*

मुकेश शेंडे
मिडिया वार्ता न्यूज़
तालुका प्रतिनिधि सिंदेवाही.
9011851745
सिंदेवाही (लाडबोरी ) : महावितरण विभाग कडून लाडबोरी ग्रामपंचायत मधील वीज कापल्याने दोन दिवसापासून ऐन पावसाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी वंचित ठेवले आहे.सविस्तर वृत्त असे की ग्रामपंचायत लाडबोरी ने महावितरण विभागाला वीज बिल भरण्यासाठी चेक दिला होता. पण काही कारणास्तव दिलेला चेक परत आला. लाडबोरी मधील काही बँक अकाऊंट मध्ये बदल न झाल्याने थोडी ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांना अडचण निर्माण होत आहे. आपल्या कर्तव्यात सक्षम असणारे सरपंच ममता चहांदे व ग्रामसेवक लोणारे यांनी वीज बिल भरण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे.पण महावितरण विभाग ने वीज बिल न भरण्याचे कारण दाखऊन ग्रामपंचायत ची वीज कापल्याने लाडबोरी गावात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. आज पावसाळ्याचे दिवस असताना गावातील महिला वर्ग शेती च्या कामासाठी जात असतात अश्यातच नळाला पाणी येत नसल्याने या महिला वर्गाची तारांबळ उडत आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यामुळे गावात रोगराई आली तर याची जिम्मेदारी महावितरण विभाग घेईल का? हा प्रश्न उद्दभवत आहे. महावितरण विभाग च्या वतीने होत असलेल्या अश्या वीज कापण्याच्या कारवाई चा लाडबोरी मधील नागरिक निषेध करत आहे.