सन्मानाच्या जीवनासाठी प्रत्येक घरातून एक मार्शल समता सैनिक दलात सामील व्हा

सन्मानाच्या जीवनासाठी प्रत्येक घरातून एक मार्शल समता सैनिक दलात सामील व्हा

सन्मानाच्या जीवनासाठी प्रत्येक घरातून एक मार्शल समता सैनिक दलात सामील व्हा
सन्मानाच्या जीवनासाठी प्रत्येक घरातून एक मार्शल समता सैनिक दलात सामील व्हा

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

वर्धा: 21/07/21आपल्या स्वार्थामुळे,अहंकारामुळे आणि बेजबाबदारपणामुळे आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आपला स्वार्थ आपण महत्वाचा मानला.तेव्हा आपले फालतू अहंकार,स्वार्थ आणि बेजबाबदारपणा सोडून संपूर्ण समाजाच्या हितासाठी आणि सन्मानाच्या जीवनासाठी समता सैनिक दल या मात्रुसंघटनेत प्रत्येक घरातुन एक एक मार्शल समाज रक्षणासाठी सामील व्हा आता एकत्र येणे ही आज काळाची गरज आहे ,असे आव्हान वर्धा जिल्हा नियोजन प्रमुख मार्शल गौतम देशभ्रतार यांनी प्रतिपादित केले.
ते समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाच्या शाखा स्थापन करण्यासंदर्भात देवरावजी इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात, वैशाली बुद्ध विहार संतानागर येथे संपन्न झालेल्या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष रवी भगत (यवतमाळ),जिल्हा प्रशिक्षक मार्शल मधुर येसनकर ,शहर संघटिका उषाताई मात्रे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर सभेला भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष मधुकर वानखेडे,किशोर मस्के,मुरलीधर कांबळे,संतोष भगत सर,देवरावजी इंगोले, प्रियदर्शनाताई भले,उमाताई इंगोले,मीनाताई मस्के,रामताई सोनपितळे, सुदर्शना ताकसांडे, लताताई लोटे,ज्योत्स्ना वासनिक आदी बौद्ध बांधव तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.