डेंग्यूने वाढविली नाचणगाव वासीयांची चिंता

डेंग्यूने वाढविली नाचणगाव वासीयांची चिंता

डेंग्यूने वाढविली नाचणगाव वासीयांची चिंता
डेंग्यूने वाढविली नाचणगाव वासीयांची चिंता

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

पुलगाव : 22/07/21नजीकच्या नाचणगावात डेंग्यू  आजाराने डोके वर काढले असून, दिवसेंदिवस डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यातील बऱ्याच रुग्णांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतले. तसेच रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये भरती असल्यामुळे रुग्णांचा शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राची संपर्क आला नाही. नाचणगाव  प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गुंजखेडा या गावात डेंग्यूचे रुग्ण नुकतेच आढळले होते. त्यानंतर नाचणगाव येथे रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे  आरोग्य यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. जेणेकरून हा फैलाव इतर भागात होणार नाही . पूलगाव ग्रामीण रुग्णालयाने पूर्ण गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून डेंग्यू आजाराची तीव्रता कमी केली हीच प्रतिबंधात्मक उपाययोजना नाचणगाव प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्राने राबविली, तर डेंग्यू आजाराचा फैलाव कमी होण्यास मदत मिळेल. कोरोना विषाणूचे सावट असताना त्यात डेंग्यूची वाढ झाल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. रिकामे भूखंड ठरत आहेत डोकेदुखी नाचणगाव ग्रामपंचायतचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे येथे  लेआउटची संख्या जास्त प्रमाणात आहे. परिणामी भूखंडधारकांची संख्या वाढली आहे अशा परिस्थितीत खाली भूखंडात पावसाचे पाणी तसेच झाडेझुडपे व काही ठिकाणी तर सांडपाणी साचलेले दिसून येते. त्यामुळे रोगराई प्रसार होण्यास आमंत्रण मिळत आहे. हे भूखंड कित्येक वर्षांत साफ झाले नसल्यामुळे तिथे जंगल निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीला ते धोकादायक ठरत आहे.
साचलेल्या पाण्यात डेंग्यूचा डास कसा राहतो, याविषयीची प्रात्यक्षि दाखवून जनजागृती केली जात आहे. डेंग्यूचे डास साठवून ठेवलेल्या पाण्यात वाढतात. यामध्ये कूलरच्या पाण्याची टाकी, पक्ष्याचे पाणी पिण्याचे भांडे, फ्रीजचा ट्रे, फुलदाणी, तुटलेले भांडे व टायर आदींचा समावेश असून यात डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होते. त्यामुळे याची वेळीच काळजी घेण्यासाठी माठातील पाणी झाकून ठेवावे व अंग झाकेल एवढ्या कपड्यांचा वापर करावा. या आजाराची उत्पत्ती एडिस नावाच्या डासापासून होत असल्याने याची ओळख पटवून उपाययोजना करावी, असे उद्‌बोधन आरोग्य सेवक दिलीप उटाणे यांनी केले आहे.