विदर्भात दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार हवामान खात्याचा अंदाजा.

✒मुकेश चौधरी✒
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
7507130263
नागपूर,,दि.22 जुलै:- वायव्य बंगालमधील चक्रीवादळामुळे विदर्भात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला असुन विदर्भात सर्वत्र मागील दोन दिवसापासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असल्याचे चित्र सर्वीकडे दिसून येत आहे.
हवामान खात्याने 22 आणि 23 जुलै ला पाऊसाबदल ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या सोबतच पूर्व विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. नदी जवळ राहत असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.
मागिल काही दिवसा पासून विदर्भात पाऊस गायब झाला होता. त्यामुळे बळीराजावर दुबारा पेरणीच संकट उभ राहल होत. पण सर्वीकडे रिमझिम पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणि आसपासच्या भागांत चक्रीवादळ सुरू झाले आहे. 3.1 किलोमीटर आणि 6.6 किलोमीटर दरम्यान समुद्रसपाटीपासून उंचीसह दक्षिण-पश्चिम दिशेने ते झुकत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात आणि खालच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या वातावरणाचा प्रभाव पडल्याने पुढील 48 तास विदर्भात 21 ते 23 जुलैदरम्यान मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवस सावधगिरीचा इशारा दिला आहे.
नागपूरसह पूर्व विदर्भातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांत पावसाने बुधवारी सकाळपासून रिमझिम हजेरी लावली. यामुळे पावसाची टक्केवारी वाढली असून पिकाला पोषक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच असा अपेक्षित पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतीसाठी पोषक असलेल्या आणि जमिनीत मुरणाऱ्या या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
मागील २४ तासांत सकाळी आठ वाजेपर्यंत नागपुरात 2.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. गडचिरोलीमध्ये 60 मि.मी., तर चंद्रपुरात बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 21.8 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. अकोल्यामध्ये 6.4, अमरावती 9.2, यवतमाळ 13, बुलढाणा 2, तर गोंदिया आणि वर्धा येथे 1.2 मि.मी. पाऊस पडला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 22 आणि 23 तारखेला विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यासोबतच पूर्वेकडील एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून, सावधगिरीचा इशारा दिला आहे. 22 जुलैला भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत, तर 23 तारखेला अमरावती व अन्य जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दर्शविला आहे.