शिव-छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर गृप व खिदमते इस्लाम कमिटी तर्फे रक्तदान शिबिर.
बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिर, भर पावसात मिळाला चांगला प्रतिसाद.

बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिर, भर पावसात मिळाला चांगला प्रतिसाद.
✒आशिष अंबादे✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा/पुलगाव,दि.22 जुलै:- या वर्षी कोविड ची परिस्थिती पाहता व वर्धा जिल्ह्यातील वाढते डेंग्यू मुळे मुख्य आयोजक अतिफ हुसेन, फहीम खान, शकिर शेख, नदीम खान यांनी भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले.
आपली सामाजिक जाबबदारी आणि बांधिलकी जपताना भारत मा के चार शिपाई हिंदू , मुस्लिम, शीख इसाई हा संदेश या रक्तदान कार्यक्रमातून दिला. मानवी समाजातील वेगवेगळ्या घटकाला रक्ताची गरज आहे व ते आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने बकरी ईदच्या निमिताने ती भागवली पाहिजे या भावनेतून त्यांनी हे शिबिराचे आयोजन केले. हे शिबीर सावंगी मेघे रुग्णालयातील ब्लड बैंकची संपूर्ण टीम तिथे उपस्थीत होती व त्या वेळी शिव छत्रपती शिवाजी महाराज रक्त पुरवठा गृप वर्धा जिल्हाचे संस्थापक अध्यक्ष गुंजन मेंढूले उपस्थीत होते. त्या वेळी 21 जणांनी रक्तदान करून या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे.
यावेळी उपस्थीत आशिष भाऊ मेश्राम, विक्रम भाऊ खडसे, प्रशांत भाऊ केमेकर, सकिब अली, ऋषीकेश कुमरे, पवन बावनकर, वृषभ पोंगडे, सिद्धांत खैरकार, अक्षय अलंकर सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.
वर्धा जिल्ह्यातील कोणत्याही रुणांला रक्त गरज असल्यास तसेच रक्त दान करण्यास इच्छुक असल्यास त्यानी संपर्क करावे असे आहवान यावेळी करण्यात आले.