पावसामुळे घराची भिंत कोसळली.*

*पावसामुळे घराची भिंत कोसळली.*

पावसामुळे घराची भिंत कोसळली.*
पावसामुळे घराची भिंत कोसळली.*

साहिल महाजन ✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज यवतमाळ 9309747836

यवतमाळ : – यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील खैरी येथील एका रोजमजूरी करणाऱ्या गरीब कुटुंबाच्या राहत्या घराची मातीची भिंत सततच्या पावसामुळे कोसळली.या दुर्घटनेमुळे त्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले असुन शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्या गरीब कुटुंबाकडून केली जात आहे.
तालुक्यातील खैरी येथील प्रभाग क्रमांक चार मध्ये राहत असलेले किशोर गणपत राऊत या रोजमजूरी करणाऱ्या युवकांचे मकान असुन गेल्या काही दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे घराची भिंत कोसळली.या दुर्घटनेत घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असुन गहू तांदूळ दाळ आदी अनाजाचेही नुकसान झाले आहे.पिडीत किशोर राऊत यांची परीस्थिती जेमतेम असल्याने त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या घटनेची माहिती स्थानिक तलाठी अविनाश पाटील यांना देण्यात आली असून तशा प्रकारचा अहवाल तलाठी पाटील यांनी तहसील कार्यालयात सादर केला असल्याचे कळते.