*वंचित बहूजन आघाडी नागपूर तर्फे वीज बिल माफीसाठी आंदोलन*
लॉकडाउन दरम्यानचे वीज बिल सरसकट माफ करा, ही मागणी घेऊन वंचित बहूजन आघाडी नागपूर आंदोलन करण्यात आले.
नागपुर:- आज मोठा प्रमाणावर राज्यातील जनता कोरोना वायरसमुळे जिवन मरणाचा छायेखाली भीतीमय जिवन जगत आहे. हाताला काम नाही, जवळ पैसा नाही, घरात अन्न धान्य नाही आणी विज बिल हजारोंचा घरात. कुठून भरायच हजारोंच विज बिल? हा प्रश्न प्रत्येक गरिब परिवार महाराष्ट्र शासनाला आणी विज मंडळाला विचारत आहे.
वंचित बहूजन आघाडी कडून विज बिल माफी करीता शहराध्यक्ष रविभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात गुरूवार ला महाराष्ट्र सरकार च्या बीजली बिलाच्या धोरणा विरोधात नारे लावून तीव्र निदर्शने केली, उर्जा मंत्री नितिन राऊत यांचा पूतळा सिंबॉलीक म्हणून ठेवण्यात आला, पोलीसांनी पूतळा जप्त केला, सहायक अभियंता नागपूर परिमंडळ यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उर्जामंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आनंद चौरे, प्रा. अजय बोरकर, प्रशांत नारनवरे, गोवर्धन भेले, लहानु बन्सोड, संदेश खोब्रागडे, रमेश कांबळे, भावेश वानखेडे, प्रविण पाटील, धर्मपाल गाडेकर, अविराज थुल, आनंद बागडे, विनित मेश्राम, भरत लांडगे, सिध्दार्थ जवादे, विशाल शेंडे, किसन बांबोर्डे, डी डी बन्सोड, बबन बन्सोड, धम्मदीप लोखंडे, अतूल गजभिये, सुनिल रामटेके, महेंद्र वाहाणे, आशीष हूमणे, भूपेश कांबळे, प्रशांत खोब्रागडे, रोशन पाटील, प्रशिक रामटेके, कुणाल वाळवे, अनुर्मित तिरपूडे, रोशन बेहरे, निशांत पाटील, आम्रपाल रामटेके, मनोज वाहाणे, शुभम पाटील, इत्यादी असंख्य कार्यकर्ता आंदोलनात उपस्थित होते.