̶हिंगणघाट तालुक्यात -लाडकी येथील विजयराव नौकरकार यांचे घर सततधार येत असलेल्या पावसामुळे कोसळले*̶

̶
प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
̶सतत आठ दिवसा पासुन येत पाऊस येत आहे.पाण्यामुळे अनेक घराची पडझड हिंगणघाट तालुक्यात होत आहेत.
̶२२- जुलै च्या रात्री १२ वाजताच्या दरम्यान -लाडकी येथील विजयराव नौकरकार यांचे घर अचानक कोसळल्याने ऐनवेळेवर त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
̶त्यांना राहण्यासाठी घर सुद्धा राहीले नाही . एक कुलर आणि मशिन या घरच्या मलब्यात दबलेली आहे .
̶त्यात घरातील साहींत्याचे तसेच जिवनावश्यक वस्तुची सुद्धा नुकसान झाले आहे । दुरदैवाने येथे कोणतीही जिवीत हानी झाली नाही ।
̶त्यांना शासन निर्णयानुसार मदत व घरकुल देण्यात यावे अशी मागणी क्षतीग्रस्त कुंटुब करीत आहे।