गडचिरोली अहेरी राखीव क्षेत्रातील जंगल परिसरात अवैध वृक्षतोड, आशिर्वाद कुणाचा?
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रामुख्याने दुर्लक्ष, त्याच्या कार्यक्षेत्रावर प्रश्न छिन्न निर्माण

✒अमोल रामटेके✒
अहेरी तालुका प्रतिनिधी
9405855335
अहेरी,दि.23 जुलै:- गडचिरोली हा वनाने नटलेला जिल्हा आहे, जिल्ह्यातील काही ठिकाण हे वन्यप्राणीसाठी राखील क्षेत्र म्हणून ठेवण्यात आले, मात्र सद्या घडीला त्या राखील क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षांना कट लावून वृक्षतोड होत आहे मात्र या कडे संबंधित वनरक्षक, राउंड ऑफिसर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सबडीओफो, डीओफो, एसीएफ आणि सीसीफ यांच्या दुर्लक्षित पणामुळे सिरोंचा वनविभाग सिरोंचा अंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र कमलापूर येथिल कोलामार्का संवर्धन राखील क्षेत्रात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे.
महाराष्ट्र राज्यतील कोलामार्का हे एकमेव रान म्हशीसाठी राखील ठेवण्यात आलेला ठिकाणी आहे, शासन निर्णय क्रमांक W.L.P 10-12/प्रक्र/क्र1 क्षेत्र 180. 72 चौ. किलोमीटर इतका आहे. याच क्षेत्रातील काही कक्ष क्रमांकात अधिकारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात कट लावून वृक्षतोड होत आहे मात्र या बाबींकडे वरीष्ठ अधिका-यांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
या क्षेत्रात वृक्षतोड होत असल्यानें येणाऱ्या काळात रान म्हशीची देखील शिकार होण्याचा मार्गावर आहे, एकीकडे तेच अधिकारी वृक्षारोपण करून वृक्षांचे संवर्धन करणे प्रत्येकांचे अधिकार आहे असे जनतेला सांगतात आणि दुसरीकडे तेच अधिकारी मूठभर पैशासाठी वृक्षतोडीस समर्थन करत असल्याचे विदारक चित्र वनपरिक्षेत्र कमलापूर क्षेत्रात दिसून येत आहे.