*घराची भिंत कोसळून दोन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू*
सांगली:- येथील सागरमळा येथे घराची भिंत कोसळून शुक्रवारी दुपारी दोन चिमुकल्या बहिणींचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात शौकपुर्ण वातावरण पसरल आहे.
वैशाली प्रकाश कुंभार (वय2) आणि तृप्ती प्रकाश कुंभार (वय 3) अशी या बालिकांची नावे आहेत. त्या आपल्या आई वडिलांन बरोबर सागरमळा येथे वास्तव्य करत होत्या.
सागरमळा येथे प्रकाश कुंभार यांचे दोन खोल्यांचे घर आहे.दुपारी मुलींची आई, आजी आणि चुलते घरात होते. त्या दोघी खेळत होत्या. आज दुपारी जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवडाभरात सतत पाऊस झाल्याने कमजोर झालेली भिंत आजच्या पावसाने अचानक कोसळली. या भिंतीखाली सापडून वैशाली आणि तृप्ती या दोघींचा मृत्यू झाला.भिंत पडल्याने मुलींची आई आणि चुलते बचावले; मात्र आजी किरकोळ जखमी झाली. सरपंच वृषाली पाटील,धनंजय पाटील,रावसाहेब सागर आणि ग्रामसेवक यांनी घटनास्थळी भेट दिली.मुलींना खाजगी दवाखान्यात नेऊन कांही उपचार करण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.