टोकयो ऑलिम्पिक: भारतासाठी खुशखबर मीराबाई चानू बनली ‘सिल्व्हर गर्ल’ जिंकल मेडल

टोकयो ऑलिम्पिक: भारतासाठी खुशखबर मीराबाई चानू बनली ‘सिल्व्हर गर्ल’ जिंकल मेडल

टोकयो ऑलिम्पिक: भारतासाठी खुशखबर मीराबाई चानू बनली 'सिल्व्हर गर्ल' जिंकल मेडल
टोकयो ऑलिम्पिक: भारतासाठी खुशखबर मीराबाई चानू बनली ‘सिल्व्हर गर्ल’ जिंकल मेडल

✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई 24 जुलै:- टोकयो ऑलिम्पिक मध्ये आज भारताने एक नवीन इतिहास बनवला आहे. आजचा दिवस प्रत्येक भारतासाठी यादगार दिवस झाला आहे. भारताच्या वेटलिफ्टिंग खेळाडू मीराबाई चानूने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये 2021 वेटलिफ्टिंग स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे.चानूनं स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात 84 किलो वजन यशस्वी उचलले. दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो यशस्वी वजन उचलल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात 89 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर क्लीन अँड जर्क गटामध्ये तिने जोरदार कामगिरी करत मेडल जिंकले.

मीराबाई चानूने आज इतिहास घडवला पण हे ध्येय गाठणं सोपं नव्हतं, यामध्ये बालपणी केलेले कष्ट आहेत, कठोर मेहनत आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, चानू देखील वयाच्या बाराव्या वर्षी तिच्या मोठ्या भावापेक्षा जास्त वजनाची लाकडं गोळा करत असे. लहानपणी घेतलेले हे कष्ट आज तिच्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये झालेल्या पराभवानंतर डगमगून न जाता आज ती पुन्हा त्याच जोमाने मैदानात उतरली आणि जिंकली!