नागपुर, वर्गात उशीर झाल्याने विद्यार्थिनीला दिली अशी शिक्षा; विद्यार्थिनीची तबेत खालावली.
नागपुर, वर्गात उशीर झाल्याने विद्यार्थिनीला दिली अशी शिक्षा; विद्यार्थिनीची तबेत खालावली.

नागपुर, वर्गात उशीर झाल्याने विद्यार्थिनीला दिली अशी शिक्षा; विद्यार्थिनीची तबेत खालावली.

नागपुर, वर्गात उशीर झाल्याने विद्यार्थिनीला दिली अशी शिक्षा; विद्यार्थिनीची तबेत खालावली.
नागपुर, वर्गात उशीर झाल्याने विद्यार्थिनीला दिली अशी शिक्षा; विद्यार्थिनीची तबेत खालावली.

✒️युवराज मेश्राम✒️
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.24 जुलै:- राज्याच्या उपराजधानी नागपुर मधून एक अमानूष प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे. देशात आणि राज्यात कोरोना वायरस महामारीमुळे सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यावर पर्याय म्हणून शहरात ऑनलाईन वर्ग सुरू झाले. ग्रामीण भागात मात्र इंटरनेट नेटवर्क फेल ठरले. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावातीलच शिक्षित तरुणांची ‘शिक्षकमित्र’ म्हणून निवड करत अध्यापन सुरू केले. मात्र हेच खाजगी ‘शिक्षकमित्र’ (स्वंयसेवक) आता विद्यार्थ्यांच्या जिव्हारी आणि शिक्षण विभागाच्या अंगलट आले आहे. कारण एका ‘शिक्षकमित्र’ तरुणीने चौथ्या वर्गातील विद्यार्थिनीला हातावर छड्या आणि तब्बल 200 खाली वर उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यामुळे चिमुकलीची प्रकृती खालावली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व शिक्षकमित्र तरुणी अशा तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग बुचे, वर्गशिक्षक राजेश चौधरी व शिक्षकमित्र आँचल मंगेश कोकाटे वय 21 वर्ष अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील महालगाव येथे जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पर्यायी अध्यापनाचा मार्ग स्वीकारत महालगाव ग्रामपंचायतीने इयत्ता 1 ते 7 पर्यंतसाठी गावातीलच शिक्षित सात तरुणांची खाजगी ‘शिक्षकमित्र’ म्हणून निवड केली. याबाबत ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने मासिक सभेत स्वतंत्र ठराव घेतला. त्यानुसार हे सेतूवर्ग शिक्षक मित्राच्या घरी कोविड नियमावलीचे पालन करून सुरू करण्यात आले. इयत्ता 4 थ्या वर्गाची जबाबदारी आँचल मंगेश कोकाटे या शिक्षक मित्राकडे होती.

9 जुलै रोजी ही विद्यार्थिनी सदर शिक्षक मित्राच्या घरी भरलेल्या सेतू वर्गात गेली असता, उशीर झाल्याच्या कारणावरून आँचल कोकाटे या खाजगी शिक्षिकेने चिमुकलीच्या हातावर छड्यांचा मार देत, 200 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यामुळे चिमुकलीला शारीरिक त्रासासह मानसिक धक्का बसला. झोपणे, उठणे, श्वास घेणेसुद्धा कठीण झाले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चिमुकलीला मानसिक धक्का बसल्याचे सांगितले. याबाबत चिमुकलीचे पालक कपिल वामन मून रा. महालगाव यांनी बेला पोलीस स्टेशनसह मुख्य कार्यकारी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळेतील सहा शिक्षकांसह खाजगी शिक्षक मित्राविरुद्ध गत 20 जुलै रोजी तक्रार केली. दरम्यान, बुटीबोरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौहान, बेला येथील ठाणेदार पंकज वाघाडे यांनी शुक्रवारी महालगाव येथे जाऊन चौकशी केली. त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक व खाजगी शिक्षक अशा तिघांविरुद्ध बेला पोलीस स्टेशनमध्ये कलम 75 बाल न्याय अधिनियम 2015, सहकलम 352, 325, 506 (1) 188, 109 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here