मुलांची तुम्हीच काळजी घ्या‘ प्रेमी बरोबर विवाहित महिला झाली प्रसार.*

53

*मुलांची तुम्हीच काळजी घ्या‘ प्रेमी बरोबर विवाहित महिला झाली प्रसार.*

अकोला :– प्रेमा मध्ये जात वय काही बघीतल जात नाही प्रेम हे प्रेम असते. प्रेम आंधळ असतं म्हणतात ते काही खोटं नाही मात्र तितकेच बेजबाबदार असते देखील खरे. अशीच एक घटना महाराष्ट्रात उघडकीस आली असून चक्क दोन मुलांना सोडून एका विवाहित महिलेने तिच्या मावस दिराबरोबर पलायन केले. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी परिसरातील ही घटना असून पोलीस तपास सुरु होण्याआधीच त्यांनी ठाण्यात येऊन हजेरी देखील लावली.
उपलब्ध माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे . पोटच्या दोन मुलांची चिंता न करता एका तीस वर्षीय विवाहितेने नात्याने मावस दीर असलेल्या आपल्या प्रियकरासोबत पलायन करून नव्याने संसार थाटला आहे .या प्रकरणी पतीने फिर्याद दिल्यानंतरही त्या दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने पोलिसांना देखील काही कारवाई करता आली नाही.
बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या येळवण इथे दोन मावसभाऊ शेजारी शेजारी राहतात. एका वर्षापूर्वी एका जणांचे दुसऱ्याच्या बायकोसोबत सूत जुळले. याची कुणकुण सदर महिलेच्या पतीला लागली. अनेक वेळा या दोघांना फोनवर बोलताना देखील पतीने पाहिले. त्याने दोघांनाही समोर बसवून त्यांची समजूत घातली मात्र परिस्थितीत काही बदल झाला नाही. प्रेमात आकंठ बुडालेल्या त्या दोघांनीही पतीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. अखेर आपल्या दोन्ही मुलांना वाऱ्यावर सोडून पत्नीने प्रियकरासोबत पलायन केले.
पत्नी पळून गेल्याचे लक्षात आल्यावर पतीने बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस तपास सुरु होण्याआधीच ते दोघे पोलीस स्टेशनला हजर झाले आणि आमचे एकमेकांवर प्रेम असून आम्ही लग्न करणार आहोत असे सांगितले शिवाय मुलांची काळजी घेण्याचा सल्ला देखील तिने पतीला दिला.दोघांचीही संमती असलेली पाहून पोलीस देखील हतबल झाले. सध्या ह्या प्रेमप्रकरणाची चर्चा परिसरात तुफान रंगली आहे .