विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हा बैठक

विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हा बैठक

विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हा बैठक
विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हा बैठक

प्रा.अक्षय पेटकर
ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी वर्धा
9604047240

आज दिनांक २४/०७/२०२१ रोजी
पेप्पर २४ हॉटेल, बॅचलर रोड वर्धा येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष विदर्भवादी शेतकरी नेते माजी आमदार वामनराव चटप साहेब, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक मा.राम नेवले, विदर्भ राज्य आंदोलन समिती महिला आघाडी अध्यक्षा रंजनाताई मामर्डे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोअर कमिटी सदस्य मधुसुदन हरणे, शेतकरी संघटना युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष सतिश दाणी, समितीचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख डॉ.आशिष ठाकरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास कोटमकर, विराआंस वर्धा जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन डाफे, युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राज ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली..
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी ९ आॅगस्ट क्रांतीदिनापासुन विदर्भचंडीका माता मंदिर,शहिद चौक नागपूर येथे होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे संपर्कप्रमुख डॉ.आशिष ठाकरे यांनी सांगितले…
बैठकीला मार्गदर्शन करताना विदर्भातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विदर्भ राज्य निर्माण करुच, लाठी खाऊ,गोळी खाऊ ..
विदर्भ राज्य आता हिसकावुन घेऊच असे वामनराव चटप यांनी सांगितले तर पश्चिम महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या निर्मितीपासुनच विदर्भाशी गद्दारी केली असून विदर्भातील युवकांच्या १२ लाख नोकऱ्या पश्चिम महाराष्ट्राने हडपल्या असल्याचे राम नेवले यांनी सांगितले…
१०८ वर्षांचे विदर्भाच्या मागणीचे हे आंदोलन आता संपविण्याची वेळ आली असुन ९ तारखेपासून सुरू होणाऱ्या बेमुदत धरणे आंदोलनाला वर्धा जिल्ह्यातील एक हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे मधुसूदन हरणे यांनी सांगितले..
या बैठकीला इंटकच्या विदर्भ अध्यक्षा अर्चनाताई भोमले यांची विशेष उपस्थिती लाभली व त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विदर्भातील कामगारांना न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
या बैठकीला शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग भालशंकर,शेतकरी संघटना युवा आघाडीचे कार्याध्यक्ष प्रमोद तलमले, शांताराम भालेराव, हेमराज ईखार, कराटे असोसिएशनचे मंगेश भोंगाडे,भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व समितीचे जिल्हा सचिव वैभव तिजारे,विदर्भ राज्य आघाडीचे आशिष इझनकर, वर्धा तालुका सोशल मीडिया प्रमुख राहुल ढोक, वर्धा जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पंकज साबळे, गणेश मुटे,जिवन गुरनुले, महादेव गोहो,धोंडबाजी गावंडे,सुनिल हिवसे,दत्ताजी राऊत, डॉ.अनिल पोकळे, डॉ.सुधिकर महाकाळकर ,गंगाधर सावरकर आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते..
या बैठकीत वर्धा जिल्ह्यातील नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या घोषित करण्यात आल्या असून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी जिल्ह्यातील युवकांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीत सहभागी होऊन पुर्ण ताकदीने आंदोलनात उतरण्याचे आवाहन विराआंसचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन डाफे यांनी केले..