दारू पिऊन हवालदाराची पोलीस महिलेसोबत बाचाबाची ; म्हणाले, ‘तुला कोरोना होईल’*

63

*दारू पिऊन हवालदाराची पोलीस महिलेसोबत बाचाबाची ; म्हणाले, ‘तुला कोरोना होईल’*

*दिघी, पुणे ग्रामीण*– दारु पिऊन पोलीस हवालदाराने रात्र पाळीला असलेल्या महिला ठाणे अंमलदार मदतनीस सोबत बाचाबाची करत शिवीगाळ केली आहे. हि घटना शुक्रवारी (दि.१८) दिघी पोलीस ठाण्याच्या इमारतीत रात्रीच्या वेळेस घडली.

याप्रकरणी महिला ठाणे अंमलदार मदतनीस यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मारुती हरिभाऊ बढेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ह्या दिघी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार मतदनीस म्हणून रात्रपाळी ड्युटीवर होत्या. त्यावेळी पोलीस हवालदार मारुती बढेकर हे च-होली येथे मार्शल म्हणून रात्रपाळी डयुटीवर होते.

बढेकर यांनी आपले कर्तव्याचे ठिकाण सोडुन दारु पिऊन दिघी पोलीस ठाण्यात येऊन फिर्यादी यांच्याशी बाचाबाची करुन आरे कारे ची भाषा करत तूला कोरोना होईल असे म्हणाले. तसेच शिवीगाळ करून अपशब्द वापरले. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.