डॉ. हरिभाऊ आदमाने महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र जुमडे यांना विनयभंग प्रकरणी अटक.

अनिल अडकिने
सावनेर प्रतिनिधी
9822724136
सावनेर/नागपूर,दि.25 जुलै:- राष्ट्र विकास शिक्षण संस्था खापा द्वारा संचालित डॉ.हरिभाऊ आदमाने महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र केशव जुमडे यांनी चड्डीवर नंगानाच करीत एका अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.ही घटना दि.22 रोजी सायंकाळी च्या सुमारास घडली.
सुरु असलेल्या धोधो पावसात सावनेर येथील हरिभाऊ आदमाने महाविद्यालयाचे प्राचार्य वीरेंद्र जुमडे यांनी चड्डीवर नंगानाच करून एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने शिक्षण क्षेत्राला फार मोठा हादरा बसला आहे.झोपडपट्टीत राहणाऱ्या पीडितेच्या तक्रारीवर सावनेर पोलिसांनी प्राचार्य जुमडे यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्र विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉक्टर हरिभाऊ आदमने कला आणि वाणिज्य महाविद्यालयात कोरोना लॉकडाऊन काळापासून मद्यपान व मटण पार्टी चे कार्यक्रम सतत चालू राहायचे.यासंबंधित सुद्धा त्यावेळी पोलिसांनी धाड टाकली होती.माध्यमांनी बातम्याही प्रकाशित केल्या होत्या.परंतु प्राचार्याच्या लागेबांधे यामुळे प्रकरण दडपण्यात आले होते. याव्यतिरिक्तही अनेक प्रकार या महाविद्यालयात घडल्याच्या तक्रारी व न्यायालयीन प्रकरणे सुरू आहे.तरी त्यांची हेकडी कायमच आहे.प्राचार्य वीरेंद्र जुमडे हे महाविद्यालयात रुजू झाले तेव्हापासूनच वादग्रस्त ठरले आहे.लॉकडाऊन मुळे सर्वत्र शाळा, महाविद्यालयाचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.त्याचाच फायदा घेत दि.22 रोजी धो-धो पाऊस सुरू असताना प्राध्यापकांचा काही स्टाफ ड्युटीवर कार्यरत होता. ड्युटी आटोपल्यानंतर काही प्राध्यापक घरी गेले तर काही स्टॉप मौजमस्ती करण्याकरिता प्राचार्य सोबत थांबला.यावेळी प्राचार्य जुमडे यांनी स्टाफ सह दारू ढोसून स्वतःचे कपडे काढीत स्टाफचा लोकांनासुद्धा कपडे काढण्यास सांगितले व मद्यधुंद नाचले.
दिवस बुडताना प्राचार्य जुमडे हे चड्डीवरच जवळील झोपडपट्टीतील एका घरात शिरून तेथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.यासंबंधित पीडितेने सावनेर पोलिसात तक्रार केली असता पोलीस अधिकारी मारुती मुळूक यांनी भादवी कलम 426/2021 354,504 सहकलम 8 व 12 बाल लैंगिक अत्याचार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून प्राचार्य वीरेंद्र केशव जुमडे वय-55 वर्ष,यास.23 जुलै रोजी नागपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी यास पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे आता महाविद्यालयात प्राचार्य सोबत नंगानाच करणाऱ्या प्राध्यापकांनाही शिक्षा ही झालीच पाहिजे.तसेच प्राचार्य जुमडे यांना निलंबित करण्याची मागणी विद्यार्थी व नागरिकांकडून होत आहे.