सध्या विद्यापीठांमध्ये आमच्यापेक्षाही जास्त राजकारण घुसल: नितीन गडकरी

सध्या विद्यापीठांमध्ये आमच्यापेक्षाही जास्त राजकारण घुसल: नितीन गडकरी

सध्या विद्यापीठांमध्ये आमच्यापेक्षाही जास्त राजकारण घुसल: नितीन गडकरी
सध्या विद्यापीठांमध्ये आमच्यापेक्षाही जास्त राजकारण घुसल: नितीन गडकरी

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914

नागपूर,दि.25 जुलै:- पुर्वी विद्यापीठांमधुन नेते बनत होते. भातरातील अनेक मोठे नेत्यांची राजकिय कारकिर्द ही विद्यापीठांमधुन सुरु झाली आणि त्यानंतर ते देशाचा राजकारण खुप दुर आणि मोठ्या पदावर गेले.

पण आता सध्या विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकारण शिरल आहे. त्यामुळे केंद्रीत मंत्री नितीन गडकरी यानी याबाबद आपल मत व्यक्त केल सध्या विद्यापीठांमध्ये आमच्यापेक्षाही जास्त राजकारण सुरू आहे. विद्यापीठात शिकलेले राजकारणी आहेत, तर आमच्याकडे कमी शिकलेले आहेत, अशी मिश्‍लिक टिपण्णी करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सत्य परिस्थितीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला.

नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकच्या भूमिपूजन सोहळ्याला नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच विद्यापीठाला कानपिचक्‍या देत त्यांनी विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रम होत असल्याचे नमूद केले. ते सांभाळा, नसेल जमत तर मला सांगा, अशा शब्दांत त्यांनी इशाराही दिला.

गडकरी म्हणाले, तुमच्याकडे (विद्यापीठाकडे) भरपूर जागा आहे. त्याचं रक्षण करता येत नसेल तर मला सांगा, मी विद्यापीठाची जागा वाचविण्यासाठी लढलो आहे. यापुढेही लढण्यासाठी तयार असल्याचे सांगत कानपिचक्‍या दिल्या.

15 ते 20 वर्षांपासून सिंथेटिक ट्रॅकची मागणी होत होती. शहरात अनेक चांगले खेळाडू आहेत. मात्र त्यांना प्रॅक्‍टिस करायला ट्रॅक नव्हता, तो आता 8 कोटी खर्च करुन बनवत आहे, असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठात आमच्यापेक्षा जास्त राजकारण चालते. कारण येथे शिकलेले राजकारणी आहेत, तर आमच्याकडे कमी शिकलेले आहेत. गंमतीचा भाग जाऊ द्या, पण खरंच विद्यापाठीत खूपच राजकारण चालते, असे नितीन गडकरी म्हणाले.