आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्या* *कामगार कल्याण मंडळाचे आवाहन*
आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्या* *कामगार कल्याण मंडळाचे आवाहन*

*आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्या*

*कामगार कल्याण मंडळाचे आवाहन*

आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्या* *कामगार कल्याण मंडळाचे आवाहन*
आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ घ्या*
*कामगार कल्याण मंडळाचे आवाहन*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मिडीया वार्ता न्यू-8208166961

गोंदिया : – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अनेकविध योजना कामगार व त्यांच्या पाल्यांकरीता आखलेल्या आहेत. पाल्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी या योजना महत्वाच्या आहेत. कामगार व कामगार कुटूंबियांसाठी कल्याणकारी योजनांची माहिती मंडळाने दिली आहे. सदर योजनांचा लाभ कामगार कल्याण निधी भरणाऱ्या सर्व बँक, एस.टी.महामंडळ, बीएसएनएल, एमएसीबी, सर्व दुकाने, दवाखाने, वृत्तपत्रातील कर्मचारी, आस्थापना कामगार, राईस मील, ऑईल मील, ऑटोमोबाईल, पेट्रोलपंप कामगार, एलआयसी कर्मचारी, एफडीसीएम कर्मचारी, जिवो स्टोर्स कर्मचारी, बजाज फायनान्स कर्मचारी, हॉटेल कामगार, बियर बार कामगार, जीवन प्राधिकरण कर्मचारी, बेकरी कामगार, कृषि उत्पन्न बाजार समिती कर्मचारी, जिल्हा मार्केटींग कर्मचारी, सोना उद्योग, पॉवर प्लान्ट, सर्व फायनान्स कपंनी आदी क्षेत्रातील कर्मचारी व कुटूंबियांना या योजनेचा लाभ घेता येईल.
इयत्ता 9 वी पासून सर्व शैक्षणिक वर्षासाठी कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याची मंडळाची योजना आहे. यासाठी किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. 2 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत सर्वसाधारण शिष्यवृत्ती दिली जाते. कामगार आपल्या पाल्यांस परदेशात शिकविण्यासाठी पाठवायचे असेल तर त्यासाठी योजना आहे. कामगार पाल्यांस 50 हजार रुपये एवढ्या रकमेची परदेश शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. राज्य व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळास क्रीडा शिष्यवृती दिली जाते.
मंडळाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ कामगार व त्यांच्या कुटूंबियांनी घ्यावा. सर्व योजनांचे अर्ज कामगार कल्याण केंद्र गोंदिया येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी 8055953732 यावर संपर्क साधावा, असे आवाहन कामगार कल्याण केंद्र संचालक ताम्रदिप जांभुळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here