धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसपोटी द्यावयाची उर्वरित रक्कम त्वरीत प्रदान करावी : आ. सुधीर मुनगंटीवार  केवळ 338 कोटी रू देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसपोटी द्यावयाची उर्वरित रक्कम त्वरीत प्रदान करावी : आ. सुधीर मुनगंटीवार 

केवळ 338 कोटी रू देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांची बोळवण

✍️संतोष मेश्राम✍️
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

चंद्रपूर :  खरीप पणन हंगाम 2020- 21 मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी अर्थात बोनसपोटी द्यावयाची उर्वरीत रक्कम त्वरित प्रदान करण्यात यावी अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ . सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

खरीप पणन हंगाम 2020- 21 मधील धानानुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रदान करावयाच्या प्रोत्साहनपर राशी अर्थात बोनस साठी तीनशे अडतीस कोटी रू रकमेला मंजुरी देण्यात आली असून दि. 1 जुलै रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वित्तीय सल्लागारांतर्फे याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या बोनसपोटी सुमारे 800 कोटी रू रक्कम थकीत असताना केवळ 338 कोटी रू रक्कम प्रदान करून शासनाने शेतकऱ्यांची बोळवण केली असून  उर्वरित रकमेसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

राज्य सरकारने धान उत्पादक शेतक-यांना देण्‍यात येणाच्या  बोनसची रक्कम  पूर्णपणे प्रदान न केल्यामुळे  चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्‍हयातील धान उत्पादक शेतक-यांवर अन्‍याय होत आहे. सध्‍या शेतीची  कामे सुरु झाली असुन बी-बीयाणे, खते व इतर शेतीविषयक साधने खरेदी करावयास व शेतीकामास शेतक-यांना पैश्‍यांची गरज असताना त्‍यांच्‍या हक्‍काचा बोनस थकीत असल्यामुळे  धान उत्‍पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे.