पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत ‘सोयाविन शेतकरी स्पर्धा’* *विजेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण*

*पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत ‘सोयाविन शेतकरी स्पर्धा’*

*विजेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण*

पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत ‘सोयाविन शेतकरी स्पर्धा’* *विजेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण*
पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत ‘सोयाविन शेतकरी स्पर्धा’*
*विजेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मिडीया वार्ता न्यू-8208166961

अकोला : – जिल्ह्यात पाणी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत ‘सोयाविन शेतकरी स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे विजेते ठरलेल्या शेतकऱ्यांना दोन सायकल कोळपे संयत्र, चिकट सापळे व प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, पाणी फाऊंडेशनचे विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, बार्शीटाकळी तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ, विद्या वाकोडे यांची उपस्थिती होती.

पाणी फाऊंडेशन समृद्ध गाव स्पर्धा अंतर्गत शेतकऱ्यांचे सोयाबीन उत्पादन वाढविण्याकरीता ‘सोयाविन शेतकरी स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वाधिक प्रश्नांची बरोबर उत्तर देणाऱ्या शेतकऱ्यांची विजेते म्हणून निवड करण्यात आली. त्यात प्रथम पारितोषिक विजेते बाळापूरचे प्रतिक रमेश बाहोकार व भगवंत रातोंडे यांना सायकल कोळपे संयत्र तर व्दितीय पारितोषिक विजेते बार्शीटाकळी येथील चेतन गावंडे व अकोलाचे ऋषिकेश महल्ले यांना चिकट सापळे पारितोषिक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.