महापूर, भीम आर्मीच्या जयाताई बनसोडे यांच मदतीच्या आवाहन, प्रदेशाध्यक्षा जयाताई बनसोडे यांच्या मदतीच्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद.
✒नीलम खरात✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.28 जुलै:- संपूर्ण कोकण पट्टा, सातारा – सांगली – कोल्हापूर ह्या व महाराष्ट्रातील इतर भागांना मुसळधार पावसाने शब्दशः झोडपून काढले असून, मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी झाली असून हजारो लोकांचे संसार वाहून गेले आहेत. हजारो गायी गुरे नामशेष झाली आहेत. राहायला घर नाही की खायाला अन्न नाही, अश्या विचित्र परिस्थितीत पूरग्रस्त जनता अडकली असून, महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी संस्था, शासन – प्रशासन आपापल्या परीने ह्या पूरग्रस्तांना होईल ती आणि करता येईल तशी मदत करण्याचे काम करीत असून, संविधान रक्षक, महाक्रांतीनायक, भीम आर्मी चीफ भाई चंद्रशेखर आझाद आणि महाराष्ट्राचं स्वाभिमानी नेतृत्व, समाजरक्षक कर्मयोद्धा प्रफुल्लभाई शेंडे यांच्या असीम प्रेरणेतून, भीम आर्मी मुंबई प्रदेशसुद्धा युद्धपातळीवर मदतकार्यात सरसावली आहे.
मुंबई प्रदेशाध्यक्षा जयाताई बनसोडे यांनी महाराष्ट्रातील जनतेला पूरग्रस्तांना मदत करण्याविषयी आवाहन करताच मदतीचा ओघ सुरू झाला असून त्याची सुरवातच पोलीस प्रशासनाकडून झाली आहे. मुंबईचे पोलीस अधिकारी पोपट साळुंखे यानी जयाताईने केलेली पोस्ट वाचताक्षणी 200 किलो तांदूळ, कांदे, बटाटे, बिस्किटे आणि इतर सामान पाठविण्यासाठी फोन केला.
जयाताई बनसोडे यांनी केलेल्या महाडच्या मदतीच्या आव्हानांची पोस्ट पाहून साहेबांचा फोन आला नेहमी प्रमाणे , “जया संध्याकाळी मी 200 किलो तांदूळ, कांदे, बटाटे, बिस्किटे आणि इतर सामानाचा ट्रक घेऊन घरी येतोय तसेच BARC च्या जयश्रीताई धेंडे, रेल्वेचे अधिकारी चंद्रमनी दांडगे इतर सर्व कर्मचारी सर्व सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, सढळ हाताने जयाताईंकडे मदत करत आहेत आणि सोबत उभे आहेत. आपला समाज जेव्हा सर्व वैचारिक मतभेद बाजूला ठेऊन संकट समयी विश्वासाने एकत्र येतो, तेव्हा वाटते अजून ही चांगुलपणा ह्या देशात टिकून आहे. म्हणूनच हा देश आम्हाला आमच्या प्राणापेक्षा प्रिय आहे. तुम्हा सर्व लोकांमुळे आम्हाला जगण्याची, लढण्याची प्रेरणा मिळते, हे नक्की!