बोलेरोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

56

बोलेरोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

 

बोलेरोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
बोलेरोच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

    

✒️आशीष अंबादे ✒️

    वर्धा जिल्हा प्रतिनिधी

         8888630841

मिडीया वार्ता न्यूज वर्धा

पुलंगाव २८/०७/२०२१

येथील नागपुर औरंगाबाद नागपूर महामार्गावर २८ जुलै दुपारी १२ ते १२-३० च्या दरम्यान बोलेरो क्रमांक एम एच ३० बि डी.१३८२ च्या चालकाने भरधाव वेगाने मोटारसायकलला धडक दिली. यात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला.

नागपूर औरंगाबाद महामार्गावरील चौफुली वर प्रदीप चौधरी हा मोटारसायकल वर जात असता अमरावती कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो गाडीने त्याला उडविले.प्रदीप लालरंगाची दुचाकी क्रमांक एम.एच.३२टी.८००१ चालवित होता.त्याला उडवून बोलेरो चालक वाहन घेऊन पळाला. ही घटना दुचाकी चालक प्रदीप चौधरी वय ४३ गाडगेनगर रहिवासी होता. घटनेनंतर परिसरात उपस्थित नागरिकांनी चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन केले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलन शांत केले. आंदोलन करणाऱ्या नागरिकांना समजाऊन मार्ग सुरळीत करण्यात आला. नागपुर औरंगाबाद महामार्गावर काही दिवसाआगोदर डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरण करताना गतिरोधक काढून टाकण्यात आले. गतिरोधक नसल्याने वाहन चालकांवर काही नियंत्रण राहिले नाही.त्यामुळे रोज लहान सहन अपघाताच्या घटना होत राहतात .२८ जुलै रोजी प्रदीप शंकरराव चौधरी (वय ४३ वर्षे )यांचा यामुळे दुर्दैवी मुत्यु झाला. घटनेनंतर रस्ता रोको आंदोलन करून गतिरोधक लावण्याची मागणी करण्यात आली. गतिरोधक असते तर आज प्रदीपचा मुत्यु टळू शकला असता.

पोलिसांनी बोलेरो क्रमांक एम एच 30 बी डी १३८१ च्या चालकावर बांधावी २७९,३०४ मोटर वाहन कायदा कलम १८४ खाली गुन्हा दाखल आला .मृतक प्रदीपच्या परिवारामधे १ मुलगी,१ मुलगा आहे.तो वेल्डिंग शटरचा व्यवसाय करत होता.