नागपुरात 1 हजार लिटर मोहफुलाची गावटी दारू पकडली, तहसील पोलिसांची कारवाई.

युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर,दि.28 जुलै:- नागपुर तहसील पोलिसांच्या पथकाने ऑटोरिक्षातून नेण्यात येत असलेली एक लाख रुपयांची एक हजार लीटर मोहफुलाची दारू मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास पकडली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास तहसील पोलीस हवालदार लक्ष्मण शेंडे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना एका ऑटोत अवैधरित्या मोहफुलाची गावटी दारू नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस पथकाने ऑटो क्रमांक एम. एच. 31, सी. व्ही-6885 जाताना दिसला. पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून ऑटो भानखेडामधील एका शाळेजवळ थांबविला. चौकशीत ऑटो चालकाने आपले नाव सोनू ज्ञानेश्वर सेलोकर रा. लालगंज झाडे चौक असे सांगितले. ऑटोतील रबराच्या 5 ट्यूबबाबत विचारणा केली असता ऑटोचालकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी ऑटोची तपासणी केली असता त्यात मोहफुलाची दारू आढळली. पोलिसांनी ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.