*आरोग्य कार्यालयाची इमारत जीर्ण, कर्मचाऱ्यांचा जीवाशी खेळ*
कळमेश्वर:- कळमेश्वर जिल्हा परिषद अंतर्गत येना-या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची इमारती जीर्ण झाली आहे. अशा जीर्ण इमारती मध्ये तालुका आरोग्य कार्यालय थाटले असून नागरिकांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे. जीवित हानी होण्याची श्यक्याता नाकारता येत नाही. या गंभीर समस्येकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कळमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी चांगली आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात याकरिता धपेवाडा, गोंडखैरी, मोहपा, तिष्टी, येथे प्राथमिक आरोग्य केन्द्र बांधण्यात आले. तेथून चालणाऱ्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयची निर्मिती करण्यात आली. यासाठी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय परिसरात असलेल्या टीनपत्राच्या इमारती मध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय थाटण्यात आले. या कार्यालयात तालुका आरोग्य आघिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, लेखापाल, डाटा ऑपरेटर, कनिष्ठा सहायक, परिचय, तंत्रज्ञ असे ९ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. परतु कार्यालयाची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात कार्यालयात गळती होत असल्याने अनेक महत्त्वाचे दस्तावेज खराब होण्याची भीती असते. या मुळे इमारतीवर सध्या ताडपत्रि टाकण्यात आली आहे. या जीर्ण इमारतीच्या समस्येमुळे अनेकदा कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होतो. शिवाय इमारतीचे छत केव्हा कोसळल याचा नेम नसल्याने कर्मचारांच्या जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.
तसेच या इमारती सभोवताल झाडेझुडपेवाढली असून साप, विंचू, विषारी कीटक व इतर विषारी प्राण्यांचा येथे मुक्त संचार असतो. त्यामुळे एखादे वेळी कर्मचार्यांना या विषारी प्राण्यापासून धोका उद्भवण्याची श्याक्याता नाकारता येत नाही. कार्यालय लगत मोठ मोठी झाडे असूनतेथे माकडांचा सतत ठिय्या असतो. कळपाने आलेले माकड इमारतीच्या छतावर धुडखुस घालतात. त्यामुळे टीनपत्र्यांचीही अधिकच दूरावस्था झाली आहे.