*पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते*
*विकास कामांचे भुमिपूजन, लोकार्पण*

*विकास कामांचे भुमिपूजन, लोकार्पण*
✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मीडिया वार्ता न्यु-8208166961
अकोला : – राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते अकोट तालुक्यात ग्रामपंचायत इमारतीचे भुमिपूजन, ग्रामपंचायत व व्यायामशाळा इमारतींचे लोकार्पण करण्यात आले.
अकोट तालुक्यातील ग्रा.पं. तरोडा येथे ग्रामपंचायत सभागृह भुमिपूजन ना. कडू यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर लोतखेड येथे ग्रामपंचायत भवन इमारत व व्यायामशाळा लोकार्पण हे कार्यक्रमही ना. कडू यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी लोतखेड येथे दिव्यांग व्यक्तिंचे अनुदानाचे धनादेश तसेच शिधापत्रिकांचे वाटप ही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.