पाहूनचारासाठी नदीतून मासे आणणे भोवले

पाहूनचारासाठी नदीतून मासे आणणे भोवले

पाहूनचारासाठी नदीतून मासे आणणे भोवले
पाहूनचारासाठी नदीतून मासे आणणे भोवले

आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

हिंगणघाट २९/०७/२१
शहरातील जुन्या वस्तीतील विवेकानंद वार्ड येथील रहिवासी नरेश विठ्ठल वानखेड़े(४८) हा इसम नदीत वाहून गेल्याची आज २९ रोजी सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान घडली. सदर घटना स्थानिक वेणा नदी पात्रात स्मशानेश्वर महादेव मूर्ती परिसरात घडली असून शोध घेतल्यानंतर अजूनही नदीपात्रात वाहून गेलेल्या इसमाचा शोध लागला नाही.

सदर इसम भोई समाजाचा असून घरी पाहुणे आल्याने पाहुण्यासाठी पाहुणचार करण्यासाठी थेट नदीवर मासेमारी करायला गेला. सदर इसम हा नेहमी मासेमारी करीत नव्हता, परंतु आज दुपारी मासेमारी करतांना वाहून गेल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. अधिक माहिती घेता बेपत्ता इसम दारुचे नशेत होता त्यामुळे त्याचा तोल गेला असावा,अशी माहिती मिळाली.

या परिसराचे नगरसेवक धनंजय बकाने यांनी सदर माहिती पोलिसांना तसेच तहसीलदार यांना कळविली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार श्रीराम मुंदड़ा तसेच ठाणेदार संपत चव्हाण यांनी आपल्या चमुसह घटनास्थळी भेट देऊन सदर इसमाचा शोध घेतला परंतु त्याचा शोध लागला नाही, उद्या या बेपत्ता इसमाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ ची चमु येण्याची शक्यता आहे.