एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा आहे दुषित,नागरिकांचे आरोग्य धोक्यात

एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा आहे दुषित,नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिवसेना पदाधिकाऱ्यांची तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा आहे दुषित,नागरिकांचे आरोग्य धोक्यात
एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा आहे दुषित,नागरिकांचे आरोग्य धोक्यात

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या (ग्रामीण) प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज

एटापल्ली:- नगरपंचायत एटापल्ली तर्फे जो रोज पाणी पुरवठा केला जातो तो पाणी पिण्या योग्य नसुन निकृष्ट दर्जाचा असून सदर पाणी हे जनावरही पिऊ शकत नाही.या पाण्याचा वापरा मुळे नागरिकांना खरूज व सर्दी खोकला आणि इतर आजार होत आहे.त्यामुळे कित्येक नागरिक रुग्णाअवस्थेत आहे. पाणी कर नियमित घेता पण नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन सदर विषयावर चर्चा करून ताबडतोब तोडगा काढावा कारण पावसाळा सुरू असून प्रत्येक ठिकाणी दूषित पाणी मिळत आहे.

आत्ता पर्यत नगरपंचायत तर्फे ब्लिचिंग पावडरचा वापर करण्यात आली नाही. व तसेच एटापल्ली नगरपंचायतला स्थायी मुख्याधिकारी नसल्यामुळे अशा अनेक अडचणी निर्माण होत असून नगरपंचायतचे कंत्राट कोणालाही विश्वासात न घेता वाटप करण्यात येत आहे.त्यामुळे स्थानिक कंत्राटदारांना याचा फटका बसत आहे.यामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांचा देवाण घेवाण होत आहे.तरी नगरपंचायतला स्थायी मुख्याधिकारी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारामार्फत जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे.

यावेळी निवेदन देतेवेळी मनिष दुर्गे शिवसेना तालुका प्रमुख एटापल्ली (शहर) राहुल आदे शिवसेना शहर प्रमुख एटापल्ली,राघवेंद्र सुल्वावार युवा नेता एटापल्ली,इशांक दहागावकर,सलिम शेख,गणेश खेडेकर,गौरव पेटकर,सुजल वाघमारे,रोहित घोष,प्रसंजीत करमरकर आदी उपस्थित होते.