संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बबनराव पडोळे यांना कोरोना योद्धा रत्न पुरस्कार

संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बबनराव पडोळे यांना कोरोना योद्धा रत्न पुरस्कार

संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बबनराव पडोळे यांना कोरोना योद्धा रत्न पुरस्कार
संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष बबनराव पडोळे यांना कोरोना योद्धा रत्न पुरस्कार

देवेंद्र सिरसाट. 
हिंगणा तालुका जिल्हा नागपूर
नागपूर:- हिंगणा तालुक्यातील संवेदना फाऊंडेशन चे अध्यक्ष बबनराव पडोळे यांचा कोरोना काळात आपल्या संघटनेच्या वतीने समाजातील गोरगरीब नागरिकांना सेवा दिल्या बाबत केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्लीच्या वतीने कोरोना योद्धा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नागपूर जिल्हा व हिंगणा तालुक्याच्या विद्यमानाने केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्लीची बैठक हिंगणा येथे पार पडली सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश लारोकर यांनी केले. बैठकीला मुख्य अतिथी राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरण चव्हाण, राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश्वर ठाकुर ,राष्ट्रीय सचिव माखनसिंह देवडा, राष्ट्रीय सहसचिव प्रफुल्ल लकरा, महाराष्ट्र सचिव भूषण बनसोड महाराष्ट्र प्रभारी पद्ममाताई पुरी, महाराष्ट्र उपसचिव, करीमभाई लालू वाले,अमरावती जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव अमरावती जिल्हा उपाध्यक्ष पवन नावों दर, संघटक चंद्रकांत पाटणकर, वंदना सावरकर शहर अध्यक्ष, महासचिव नितीन सोनटक्के, जिल्हा संघटक संतोष सोनटक्के, उपाध्यक्ष अमरावती शहर मनीष राऊत, अकोला जिल्हाध्यक्ष पवन जाधव ,अमरावती शहर अध्यक्ष गणेश जांभुलकर,चिखलदरा तालुका अध्यक्ष शिवकण्या वरघट , नेर तालुका अध्यक्ष संजयराव मेहकर, अचलपूर तालुका अध्यक्ष शारदा पांडे,नागपूर जिल्हाध्यक्ष रवींद्र खेडकर,सचिव समाधान माने, जिल्हा सहसचिव काकडे ,माजी सरपंच मनोहरराव खेडकर,पोलीस उपनिरीक्षक दिलीपराव अडाळकर, सुधाकर बगेकर, दादाराव पांडे, माजी नगराध्यक्ष छायाताई भोसकर, अमरावती जिल्हा महिला अध्यक्ष रुकसाना निसार ,प्रतिभाताई पाटील, नगरसेवक नरेंद्र बेहरे, तालुका अध्यक्ष – प्रशांत जोशी, उपाध्यक्ष उमेश धोटे, सचिव समीर जिचकार, प्रसिद्धी प्रमुख भास्करराव धार्मिक, कोषाध्यक्ष विनोद भुरे, संघटन प्रमुख संजय ठाकरे, सदस्य लखन ठाकरे, महादेव मांदाले, हिरालाल मडावी, शुभम बुराडे, किशोर मांदाले, भाऊराव लंबोदरी, वंदना सावरकर,सुरेखाताई जिचकार, राजेंद्रजी कोल्हे, विष्णूं कोल्हे आदींच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली. व त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच कोरोना योद्धा रत्न म्हणून विनायक इंगळे ( गुरुजी) मधुसूदन चरपे, बबनराव पडोळे, गजानन ढाकुलकर, रजुभाऊ इंचलवार, संजय खडतकर, शिवशंकर दांडेकर यांना सन्मानित करण्यात आले.