चंद्रपुर जिल्हा हादरला, पत्नीने प्रियकरासोबत संगममत करुन पतीची केली हत्या.

चंद्रपुर जिल्हा हादरला, पत्नीने प्रियकरासोबत संगममत करुन पतीची केली हत्या.

चंद्रपुर जिल्हा हादरला, पत्नीने प्रियकरासोबत संगममत करुन पतीची केली हत्या.
चंद्रपुर जिल्हा हादरला, पत्नीने प्रियकरासोबत संगममत करुन पतीची केली हत्या.

✒️सौ.हनिशा दुधे✒️
बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर/बल्लारपूर,दि.31 जुलै:- चंद्रपुर जिल्हात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने प्रियकर आणि आईशी संगममत करुन गळा आवळून आपल्याच पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत इसामाचे नाव मारुती काकडे असे असून ते कोळसा खाणीत कामावर होते. पतीचा गळा आवळुन हत्या केल्यानंतर महिलेने मृतदेह पोत्यात भरून बल्लारपूर येथील नदीकिनारी फेकला होता. या हत्या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी, पत्नीची आई, पत्नीचा प्रियकर आणि अन्य एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सचा वापर करत अत्यंत क्लिष्ट प्रकरणाचा गुंता सोडवला. मद्यपी पतीला संपवून सरकारी नोकरी मिळवत प्रियकरासोबत विवाह करण्याचा आरोपी पत्नीचा बेत होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात ‘पती पत्नी और वो’ चा हिंसक प्रकार पुढे आलाय. जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वर्धा नदीकिनारी काही दिवसांपूर्वी पोत्यात भरून फेकून दिलेला एक मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला होता. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत मारूती काकडे हे सरकारी कोळसा कंपनीत खाण कामगार होते. त्यांना दारु पिण्याची सवय असल्याने त्यांचे त्यांच्या पत्नीशी सतत वाद होत असत. मारुती काकडे यांच्या पत्नीचे स्वतःच्या बहिणीचा दीर संजय टिकले याच्याशी जवळचे संबंध होते. मारूती काकडे यांची पत्नी आणि संजय टिकले या दोघांनी मारूती काकडे यांचा काटा काढण्यासाठी कट रचला. पतीला संपवल्यानंतर त्यांची सरकारी नोकरी आपल्याला मिळेल व प्रियकरासोबत विवाह करून आपले आयुष्य सुखी होईल, असा आरोपी महिलेचा हेतू होता.