अहेरी-खमनचेरु रस्ताची प्रचंड दुरावस्था, रस्तात खड्डा की खड्डयात रस्ता?
अहेरी-खमनचेरु रस्ताची प्रचंड दुरावस्था, रस्तात खड्डा की खड्डयात रस्ता?

अहेरी-खमनचेरु रस्ताची प्रचंड दुरावस्था, रस्तात खड्डा की खड्डयात रस्ता?

अहेरी-खमनचेरु रस्ताची प्रचंड दुरावस्था, रस्तात खड्डा की खड्डयात रस्ता?
अहेरी-खमनचेरु रस्ताची प्रचंड दुरावस्था, रस्तात खड्डा की खड्डयात रस्ता?

✒अमोल रामटेके✒
अहेरी तालुका प्रतिनिधी
9405855335
अहेरी :-
शहरातील अहेरी खमनचेरु रस्ताची सद्या प्रचंड दुरावस्था झाली आहे, जनतेला आणि वाहनांना ह्या रस्तावरून जातांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, सद्या रस्तात खड्डा की खड्डयात रस्ता हे समजनेही कठीण झाले आहे.

अहेरी तालुक्यातील गावांमध्ये रहदारी करण्याकरिता तसेच गावोगावी पोहोचायला रस्त्याची गरज आहे, त्याच अनुषंगाने राज्य व केंद्र सरकार ने मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रत्येक गावात रस्त्या बनविण्यात येत आहे. परंतु पावसाळ्यामध्ये रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडून असल्याने या रस्त्यांवरून ये-जा करता येत नाही. रस्त्यांवर खड्डे पडून खड्यात पाणी जमा होऊन रस्ताच दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे.

अहेरी मुख्यालय पोहोचायला तसेच अत्यावश्यक सुविधा आत्मसात करायला नागरिकांना त्याच मार्गाने गाठावे लागत आहे. रस्त्यावर दोन-चाकी व चार-चाकी वाहन चालवितांना कधी कुठे अपघात होईल असा विचार मनात ठेवून वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या रस्त्यावर खड्डे पळून रस्त्याचा पूर्ण भाग पाण्याने व्यापून आहे, या रस्त्यात मोठे खड्डे असून तिथे कुठे कधी जीवित हानी होईल सांगता येत नाही.

दानशूर चौकापासून ते खमनचेरू मार्गात उपजिल्हा रुग्णालय, वीज पुरवठा कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, तहसील कार्यालय, एकलव्य कोविड सेंटर, प्रोजेक्ट ऑफिस, रीपब्लिक स्कूल इत्यादी महत्त्वाचे कार्यालय असून नागरीकांना याच मार्गावर प्रवास करावा लागत आहे.

अहेरी तालुक्यातील रस्त्यांना मुभा कधी मिळेल…? नागरिकांकडून प्रश्न उपस्थित

शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांना वाटते आपण गेलेला काम हे ठरलेल्या कालावधीत पूर्ण व्हावा, परंतु रस्त्यावरून घाईत जाणे म्हणजे जीवाला धोक्यात घालने. पाणी खड्ड्यात साचून रस्ते दिसत नाही, फक्त रस्ताच आहे म्हणून समोर चालला की लहान मोठा खड्डा असतोच जर ते भरवेगात येईल तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून मुख्यालयातून बाहेर जाणाऱ्या तसेच शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची व्यवस्था होऊन ते कधी मार्गी लागतील याच्या प्रतिक्षेत नागरिक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here