वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीचा सांगली जिल्हा पूरपरिस्थिती पाहणी दौरा संपन्न.

✒️ संजय कांबळे✒️
सांगली जिल्हा प्रतिनिधी
9890093862
सांगली,दि.1ऑगस्ट:- महाराष्ट्रातील महाभयंकर पूरस्थिती मुळे महाराष्ट्रातील बरेचशे जिल्हे व शहरे बाधित झाली आहेत. ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब यांच्या आदेशाने तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी केलेल्या आवाहनानुसार वंचित बहुजन आघाडी तर्फे मदतीचे काम सुरु झालेले आहे. सर्वाधिक बाधित अशा कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यातील गावे आणि शहरांमध्ये पक्षाच्या परिपत्रका नुसार महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरु आहे.

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, राज्य प्रवक्ते प्रियदर्शि तेलंग, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, महिला आघाडी राज्य सदस्य डॉ.क्रांतीताई सावंत, प्रा. सम्राट शिंदे सर यांनी सांगली जिल्ह्यातील सन 2019 च्या पुर परिस्थितीत मोठी हानी झालेल्या, ब्रह्मनाळ हे गाव ॲड.प्रकाश तथा बाळासाहे यांनी दत्तक घेतलेल्या गावासहीत, कासेगाव, वाटेगाव, पेठ, वाळवा, पलुस, भिलवंडी, अंकलखोप, वसगडे, डिग्रजआदी गावाबरोबर दक्षिण क्षेत्रातील ढवळी, धामनी, बामणी, या सहीत सांगली शहरातील विविध भागातील पूरग्रस्त घरांची व परिसराची पाहणी करून तेथील नागरिकांना दिलासा दिला व सर्व गरजूंना अन्नधान्य,कपडे, जीवनावश्यक वस्तू व इतर सर्व अडचणींचा आढावा घेतला व लवकरात लवकर पुनर्वसन होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

यावेळी पूरग्रस्त भागातील नागरिकांनी आपली कैफियत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य पदाधिकारी यांच्यासमोर मांडली. यावेळी राज्य पदाधिकाऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, (उत्तर) जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे, जिल्हा महासचिव उमर फारूक ककमरी,युवा आघाडी अध्यक्ष सुनील कोळेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, सांमिकु मनपा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत कदम,जिल्हा उपाध्यक्ष केतन माने,मिरज तालुक्याचे संजय अशोक कांबळे, किशोर आढाव, परशुराम कांबळे, हिरामण भगत, अक्षय कांबळे, अशोक लोंढे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, आकाश सदाकळे, विजय कांबळे, मिलिंद कांबळे, विशाल धेंडे, अनिल मोरे, प्रभाकर शेंडगे, सतीश शिकलगार, मानतेश कांबळे, चंद्रकांत होवाळे, पृथ्वीराज कांबळे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.