हिंगणघाट वर्षावास निमीत्त उपोसत्त दिनाचे आयोजन.

53

हिंगणघाट वर्षावास निमीत्त उपोसत्त दिनाचे आयोजन.

हिंगणघाट वर्षावास निमीत्त उपोसत्त दिनाचे आयोजन.
हिंगणघाट वर्षावास निमीत्त उपोसत्त दिनाचे आयोजन.

✒️आशिष अंबादे✒️
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
हिंगणघाट,दि.29 जुलै:- हिंगणघाट शहरातील स्थानिक सिद्धार्थ नगर मध्ये वर्षावासाचे औचित्य साधून उपोसत्त पालन दिनाचे आयोजन स्थानिक सिद्धार्थ बुद्ध विहारात येथे रविवार दिनांक 1 आगस्ट ला सकाळी 9 वाजता करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ नगर बाल मित्र मैत्रिणीनी उपसत्त दिवस पाळण्याचा संकल्प ग्रहण करुन तथागत गौतम बुद्धानी दिलेल्या पंचशीलाचे ग्रहण केले.

बाल मनावर योग्य ते सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक संस्कार व्हावे या ऊद्देशाने वर्षावास निमीत्त उपोसत्त दिन पाळण्यात आले. या निमीत्त संजय वानखेडे केंद्रीय शिक्षक भारतिय बौद्ध महासभा यांच्या उपस्थीतीत धम्मप्रवचन धम्म प्रबोधनाचे आयोजन केले होते.

आज मोठ्या प्रमाणात मुल तथागत बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषा विचारा पासून दुर जात आहे. त्याच्या मध्ये वचन संस्कृती कमी होत चालली आहे. नव भारताची येणारी पुढील पिढीही विचारशील, धम्मशील, शिक्षित तयार होणे आज सर्वाची गरज आहे. आज धार्मिक आणि जातीय असंतोष, मतभेद वाढत आहे. घरोघरी व्यसाधीनता आणि अंधश्रद्धामुळे अनेक परिवार आपले जीवन दुखाच्या सावटाखाली जगत आहे. आज संपुर्ण विश्व बुद्धाचा मंगल विचार आत्मसात करुन आपली आपल्या परीवाराची आणि देशाची प्रगती करत आहे.

भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घरघरात गेले पाहिजे म्हणुन दि सिम्बॉल ऑफ नोलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तर्फे सर्व मुला मुलीना बुद्ध आणि त्यांच्या धम्म, अंधश्रध्देचे दलाल, दि टीचिंग ऑफ बुद्धा हे पुस्तके वाचण्याकरिता देण्यात आली. यावेळी हर्ष चांदूरकर जयवर्ष झाडे, प्रबुद्ध कुंभारे, अर्थव दुर्गे, सुबुद्ध कुंभारे, सारीपुत्त कांबळे, स्वप्निल दुर्गे, संस्कृती दुर्गे, नंदनी कांबळे, वर्षा झाडे उपोसत्त पालन करण्याचे निश्चय केला.

यावेळी दि सिम्बॉल ऑफ नोलेज डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या सदस्या मायाताई दुर्गे, ज्योती मानकर, वर्षा झाडे, भावना ढेकले, अर्चना झाडे प्रमुख्याने उपस्थित होत्या.