पुलगावच्या लेकी ला मिळाला “बेस्ट सोशल वर्क वर्क किताब     

48

    पुलगावच्या लेकी ला मिळाला “बेस्ट सोशल वर्क वर्क किताब

 

पुलगावच्या लेकी ला मिळाला "बेस्ट सोशल वर्क वर्क किताब     
पुलगावच्या लेकी ला मिळाला “बेस्ट सोशल वर्क वर्क किताब

    

   ✒️आशीष अंबादे ✒️

    वर्धा जिल्हा प्रतिनिधी

         8888630841

मिडीया वार्ता न्यूज वर्धा

पुलगाव 01/08/21

पुलगावच्या वानखेडे परिवाराची लेक डॉ.जया नितीन जाणे हिला पुण्यातील बालेवाडी येथील आर्किड हॉटेलमध्ये मेडिक्विन मिसेस महाराष्ट्र स्पर्धेच्या अंतिम फेरीत “बेस्ट सोशल वर्क” हा किताब मिळाला .सोबतच “रोल मॉडेल “हा किताब देखील तिला देण्यात आला. 

 

विविध वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी मेडिको पिंजट तर्फे सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे तीनशे महिला डॉक्टरांनी सहभाग नोंदवला होता. यातील 40 स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहोचले. या स्पर्धांमधून सोशल वर्क फेरीकरिता 12 स्पर्धकांची निवड करण्यात आली होती व यात “बेस्ट सोशल वर्क” हा किताब डॉक्टर जया जाणे यांनी पटकावला. प्रत्येक स्त्रीला आरोग्यपूर्ण आनंददायी जीवन हा उद्देश घेऊन सर्व सहभागी डॉक्टर यात काम करतात.

 

या स्पर्धेच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रेरणा वेरी कालेकर या आहेत. स्पर्धेच्या समन्वयक म्हणून डॉक्टर प्राजक्ता शहा ,योगेश पवार यांनी कोरिओग्राफर तर कशिष प्रोडक्शन कंपनीने व्यवस्थापकीय काम पाहिले. या स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध अभिनेते समीर धर्माधिकारी ,डॉक्टर कांचन मदार, डॉक्टर मीनाक्षी देसाई, डॉक्टर अश्विनी पाटील, पूजा वाघ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावर्षी मेडिक्विन ने आपले सामाजिक कार्य म्हणून पंधराशे सॅनिटरी पॅड धरती फाऊंडेशनला देण्यात आले. डॉक्टर जया जाणे यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहे.

 

डॉक्टर जया गाणे यांनी पटकावलेल्या बहुमानाबद्दल पुलगाव येथील त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यात संदीप ढोमणे, डॉक्टर संजय सांगोले, डॉक्टर श्याम पोटदुखे, डॉक्टर 

 रामविलास राठी, दिलीप बन्नगरे, डॉक्टर निलेशसिंग ठाकूर,तायडे काका, निर्मला पचारे यांचा समावेश आहे.