हिंगणघाट, समुद्रपूर , सिंदी विधानसभा अंतर्गत शिवसेनेला मोठा धक्का,

18

हिंगणघाट, समुद्रपूर , सिंदी विधानसभा अंतर्गत शिवसेनेला मोठा धक्का,

हिंगणघाट, समुद्रपूर , सिंदी विधानसभा अंतर्गत शिवसेनेला मोठा धक्का,
हिंगणघाट, समुद्रपूर , सिंदी विधानसभा अंतर्गत शिवसेनेला मोठा धक्का,

प्रा.अक्षय पेटकर
वर्धा जिल्हा प्रतिनिधी ग्रामिण
9604047240

= नंदोरी सर्कल मधून पडली खिंडार = शिवसैनिकांचे राजीनामे माजी आ.अशोक शिंदे यांचे नेतृत्वावर विश्वास
= पक्ष प्रमुखा कडे पाठविले राजीनामे
समुद्रपूर : –
जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात कार्यरत शिवसेना उपनेते व माजी मंत्री अशोक शिंदे यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद आता उमटायला सुरवात झाली असून, सध्या स्थितीत फक्त नंदोरी सर्कल मधून अनेक शिवसैनिक व माजी. जि.प सदस्य तसेच प. स. सदस्य व शिवसैनिकांनी पक्ष सोडण्याचे निवेदन उपजिल्हाप्रमुख प्रमोद भाटे यांचे मार्फत पक्षाप्रमुखांना पाठविले आहे.
सध्या परिस्थितीत परिणामत आता जिल्ह्यातील व तालूक्यातील राजकारणात खळबळ माजलेली आहे, हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी रेल्वे विधानसभा मतदार संघातील प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून अशोक शिंदे यांना ओळखल्या जातात, त्यात त्यांनी १५ वर्ष आमदार, राज्यमंत्री, व पूर्व विधार्भातील शिवसेनेचे मातब्बर नेते म्हणून शिंदे यांना ओळखले जात होते, ते संघटनेत उपनेते म्हणूनही कार्यरत असताना त्यांना पक्षसंघटनेत गेल्या दीड वर्षे झाली डावल्याचा आरोप स्थानिक शिवसैनिकांनी केला असून, तीस ते पस्तीस वर्षापासून पक्ष बळकट करणाऱ्या नेत्यावर अन्याय झाला असल्याने नंदोरी सर्कल मधील सक्रिय पदाधिकाऱ्यांनी पक्ष सदस्य पदाचा राजीनामे सोपविले आहे, यानंतर क्रमाक्रमाने हिंगणघाट विधानसभा अंतर्गत प्रत्येक सर्कल मधील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी आपल्या पदाचे राजीनामे सादर करतील अशी माहिती मिळाली आहे,
मात्र आज नंदोरी सर्कल अंतर्गत जिल्हा परिषद सर्कल प्रमुख गजानन बोरेकर, सुरेश अरडे, प्रल्हाद नांदूरकर, शाखाप्रमुख परडा, निंभा सरपंच गजानन दांडेकर, पंचायत समिती सर्कल प्रमुख प्रवीण धोटे, शाखाप्रमुख कवठा, मनोहर हिवरकर, नारायण बैलमारे, विठ्ठल रोकडे, तालुका संघटक बाळा जमुनकार, गुणवंत कोठेकर, माजी तालुका प्रमुख रवींद्र लढी, निलेश शिंदे, जगदीश मांडवकर, विपीन चॅनेकर, अमोल मुडे, राजू चौधरी, हिरामण मोहदरे, रमेश उईके, नितीन वैद्य, शेखर वैद्य, विनोद वैद्य यांनी उपजिल्हा प्रमुख प्रमोद भाटे यांचे मार्फत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे .
आज फक्त नंदोरी सर्कल मधिल शिवसैनिकांनी राजीनामे दिले पण आता या पुढे हिंगणघाट, समुद्रपूर, कांढळी, कोरा , गिरड, जाम, असे अनेक शिवसैनिक राजीनामे देतील .यानंतर प्रत्येक सर्कल नुसार राजीनामा सत्र सुरू होणार असल्याची माहिती माजी तालुका प्रमुख रवींद्र लढी यांनी दिलेली आहे .